ETV Bharat / city

Param Bir Singh Enquiry : परमबीर सिंग यांची सोमवारी पुन्हा चांदिवाल आयोगासमोर चौकशी होणार - 100 crore recovery case

निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाच्या एका सदस्यीय समिती समोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या तिघांचीही चौकशी करण्यात आली आहे. आता या आयोगासमोर पुन्हा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची पुन्हा चौकशी करण्यात ( Param Bir Singh Enquiry ) येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी परमबीर सिंग यांची चौकशी आयोगासमोर होणार आहे.

Param Bir Singh Enquiry
परमबीर सिंग
author img

By

Published : Dec 18, 2021, 11:55 AM IST

मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणाची ( 100 crore recovery case ) चौकशी करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाच्या ( Chandiwal Commission ) एका सदस्यीय समिती समोर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या तिघांचीही चौकशी करण्यात आली आहे. आता या आयोगासमोर पुन्हा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार ( Param Bir Singh Enquiry ) असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी परमबीर सिंग यांची चौकशी आयोगासमोर होणार आहे.

चांदीवाल आयोगासमोर चौकशी -

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार रेस्टॉरंट मधून शंभर कोटी वसुली करण्याचे सचिन वाजे यांना टार्गेट दिले होते असे धक्कादायक खुलासा पत्राद्वारे केला होता. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर राज्य सरकारने या सर्व प्रकरणाची तपास करण्याकरीता निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या एक सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले होते. या समितीसमोर आतापर्यंत अनिल देशमुख, सचिन वाझे यांचे जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात परमबीर सिंग यांचादेखील जबाब नोंदविण्यात आला.

केले होते प्रत्रिज्ञापत्र दाखल -

परमबीर सिंग यांनी या पहिलेच आयोगासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले होते की मला या प्रकरणात कुणाची ही उलट तपासणी करायची नाही आहे तसेच माझ्याकडे कुठलेही पुरावे नसल्याचे देखील म्हटले आहे. जे आरोप केले आहेत ते ऐकीव माहितीवरून केले आहे, असे देखील या प्रतिज्ञापत्रात परमबीर सिंग यांनी आयोगासमोर म्हटलेले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहेत.

हेही वाचा - Anil Deshmukh Case : अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची ईडीकडून चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.