मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत अन्य साथिदारांविरोधात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात नवी माहिती समोर ( Parambir Singh Recovery Case ) आली आहे. संजय पूनमिया याने व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल याला फसवण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरद्वारे गॅगस्टर छोटा शकील याचा आवाज काढून खंडणी मागितल्याची माहिती सीआयडी तपासात उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सीआयडीने केलेल्या तपासानुसार, संजय पूनामियाने व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवालला फसवण्यासाठी VPN द्वारे छोटा शकीलचा आवाज काढून खंडणी मागितली ( Chhota Shakeel Voice using Recovery ) आहे. पूनामियाने अग्रावाल यांना फोनद्वारे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर अग्रवाल यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, संजय पूनामिया, विकासक सुनील जैन, दोन एसीपी अधिकारी, एक डिसीपी आणि दोन पोलीस निरीक्षकांवर गुन्हा दाखल झालेला.
सीआयडीकडे तपास
याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ( Marin Drive Police Station ) पुनमिया आणि जैन यांना अटकही केली होती. तपास योग्य रितीने व्हावा यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. सीआयडीने तपासात पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटकही केली आहे.