ETV Bharat / city

Panvel New Year Restriction : "कोरोनाचे नियम डावलून पार्टी कराल तर..", पोलिसांचा इशारा - पनवेलमधील फार्म हाऊसवर पार्टी करण्यास बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरातील फार्म हाऊसवर पार्टी करण्यावर बंदी ( Panvel New Year Party Ban ) घातली आहे. फार्म हाऊस मालक आणि पोलिसांत बैठक पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. तसच, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Panvel New Year Restriction
पनवेल परिसरातील फार्म हाऊसवर पार्टी करण्यावर बंदी
author img

By

Published : Dec 29, 2021, 5:10 PM IST

नवी मुंबई : पनवेल परिसरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार असलेल्या फार्म हाऊस मध्ये पार्टी करण्यावर बंदी ( Panvel New Year Party Ban ) घालण्यात आली आहे. जे नियम डावलून 31 डिसेंबरला सेलिब्रेशन करतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राज्यात आणि मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे ( Maharashtra Corona cases Increased ). त्या पार्श्वभूमीवर फार्म हाऊस मालक आणि पोलिसांत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.

पनवेलमधील फार्म हाऊसवर चोख बंदोबस्त

पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्महाऊस आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईत निर्बंध लादण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या फार्महाऊसवर रात्रभर धिंगाणा चालू नये यासाठी पोलीसांकडून कडक बंदोबस्त लावला जाणार आहे. तसेच, कोरोनाचे नियामांना डावलून फार्महाऊसवर गर्दी करुन पार्टी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी पनवेल पोलिसांनी केली आहे.

जंगी पार्ट्यांचे आयोजन; पोलिस उपायुक्त म्हणाले...
याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त म्हणाले, 'पनवेल परिसरात अनेक फार्म आहेत. त्याचप्रमाणे, सिने सृष्टीतील व्यक्तींचे देखील फार्म हाऊस याच परिसरात आहेत. मागील काही वर्षापासून येथे फार्म हाऊसचे पेव वाढले असून, जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, फार्महाऊस मालकांची बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले.'

हेही वाचा -Supriya Sule Corona Positive : खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.