ETV Bharat / city

Pankaja Munde : ...अन् वडिलांच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या - ETV Bharat Maharashtra News

प्रचारादरम्यान आपल्या पायाला फोड आले होते, तरी पायाला पट्टी बांधून आपण प्रचार केला असे सांगताना पंकजा मुंडे गहिवरल्या. यावेळी पत्रकारांनी दुःख वाटत आहे का असे विचारले असता वडिलांची आठवण आली असे त्या म्हणाल्या. दिवंगत गोपीनाथ मुंडेंना तर शपथही घेता आली नाही असे सांगताना यावेळी त्या गहिवरल्या.

Pankaja Munde : ...अन् वडिलांच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या

author img

By

Published : Jul 9, 2021, 5:03 PM IST

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देताना आपला पक्षाच्या निर्णयावर आक्षेप नसल्याचे पंकजा मुंडेंनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. यावेळी बोलताना वडिलांच्या आठवणीने पंकजा मुंडेंच्या डोळ्यांत पाणी आल्याचे चित्र बघायला मिळाले.

Pankaja Munde : ...अन् वडिलांच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या
वडिलांच्या आठवणीने पंकजा मुंडेंच्या डोळ्यात पाणी
राज्यात भारतीय जनता पक्षाची अवस्था बिकट असताना निवडणुक प्रचारासाठी मी आणि वडील गोपीनाथ मुंडे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत मतदारांपर्यंत पोहोचत होतो. सभांवर सभा घेत होतो, याची आठवण पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. प्रचारादरम्यान आपल्या पायाला फोड आले होते, तरी पायाला पट्टी बांधून आपण प्रचार केला असे सांगताना पंकजा मुंडे गहिवरल्या. यावेळी पत्रकारांनी दुःख वाटत आहे का असे विचारले असता वडिलांची आठवण आली असे त्या म्हणाल्या. दिवंगत गोपीनाथ मुंडेंना तर शपथही घेता आली नाही असे सांगताना यावेळी त्या गहिवरल्या.
दुसऱ्या टर्मचे पेन्शन मिळत नाही
2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे खासदार म्हणून निवडून आले. त्याआधी 2009 मध्येही गोपीनाथ मुंडे खासदार होते. मात्र 2014 ला खासदार म्हणून शपथ घेण्याआधीच गोपीनाथ मुंडेंचे दुर्देवी निधन झालं. केवळ शपथ घेतली नाही या तांत्रिक कारणामुळे दुसऱ्या टर्मचे पेन्शन आईला मिळत नाही असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा - आम्ही नाराज नाही, मंत्रिपद मिळालेल्यांविषयी आनंदीच, पंकजा मुंडेंनी दिले स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.