ETV Bharat / city

मुंबई उपनगर आणि मीरा-भाईंदर मेट्रोने जोडले जाणार; मेट्रो 9 मार्गात नवीन 'पांडुरंग वाडी' स्थानक उभारणार - mmrda news

आता मुंबई पश्चिम उपनगरे आणि मीरारोड-भाईंदर शहरे मेट्रोने जोडली जाणार आहेत. दहिसर-मीरारोड मेट्रो 9 मार्गात पांडुरंग वाडी नावाने एक नवीन मेट्रो स्थानक बांधत ही शहरे जोडण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

metro
मेट्रो संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 6, 2020, 8:49 PM IST

मुंबई - मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश एकमेकांशी जोडत त्यांच्यातील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी मेट्रोचे जाळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून विणले जात आहे. अशात आता मुंबई पश्चिम उपनगरे आणि मीरारोड-भाईंदर शहरे मेट्रोने जोडली जाणार आहेत. दहिसर-मीरारोड मेट्रो 9 मार्गात पांडुरंग वाडी नावाने एक नवीन मेट्रो स्थानक बांधत ही शहरे जोडण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

मुंबई-एमएमआरमध्ये अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने 337.1 किमीचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यातील 11 किमीचा मेट्रो 1 मार्ग सेवेत दाखल झाला आहे. तर पुढच्या वर्षी मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 हे मार्ग सेवेत दाखल होतील. तर 337.1 किमीचा हा संपूर्ण मार्ग (प्रकल्प) 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस एमएमआरडीएचा आहे. याच 337.1 किमीच्या प्रकल्पात दहिसर ते मिरारोड या मेट्रो 9 मार्गाचा ही समावेश आहे.

दरम्यान, हे सर्व मार्ग एकमेकांशी मेट्रो स्थानकांनी जोडण्यावर ही आता एमएमआरडीएने भर दिला आहे. त्यातुनच अनेक मेट्रो मार्गात नवीन स्थानक प्रस्तावित करण्यात येत आहेत. त्यानुसार मेट्रो 9 आणि मेट्रो 10 (गायमुख ते शिवाजी चौक, मिरारोड) ही दोन मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडली जाणार आहेत. यासाठी 11 किमीच्या मेट्रो 9 मार्गात 'पांडुरंग वाडी' हे नवीन मेट्रो स्थानक बांधण्यात येणार आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, जुना दहिसर जकात नाका येथे हे नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे. या नव्या स्थानकामुळे आता या मार्गात 8 ऐवजी 9 स्थानके असणार आहेत. तर या नव्या स्थानकासाठी जकात नाक्याची कमान पाडली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक ती परवानगी घेण्यात आली आहे.

ही कमान पाडल्यानंतर एमएमआरडीएकडून नवीन कमान बांधून दिली जाणार आहे हे विशेष. तर या कामासाठी 150 बांधकामे हटवावी लागणार आहेत. पण, या नव्या मेट्रो स्थानकामुळे मुंबई उपनगर आणि मिरारोड एकमेकांशी जोडली जाणार असून, नागरिकांची मोठी सोय होणार आहे हे महत्वाचे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.