मुंबई - राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तर अनेक भागात चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र-
महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक तर गेलेच आहे. पंरतु घरा-दाराचे नुकसानही फार झाले आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील. पंरतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
-
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा!
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची राज्य सरकारकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtra pic.twitter.com/fnCIswerMO
">शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा!
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 29, 2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची राज्य सरकारकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtra pic.twitter.com/fnCIswerMOशासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा!
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 29, 2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची राज्य सरकारकडे आग्रही मागणी.@CMOMaharashtra pic.twitter.com/fnCIswerMO
तसेच आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीने शेतकरी फार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासने आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे. प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आता शेतकरी बांधवांकडे नाही, याचा विचार करावा आणि सत्वर पावले टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
हेही वाचा - किल्लारी भूकंप 1993 : घरांचे पुनर्वसन झाले, मनाची पुनर्बांधणी कशी करणार?