ETV Bharat / city

पालघर मॉब लिंचिंग : जावेद अख्तर यांनी केला निषेध, म्हटले, 'गुन्हेगारांना माफ नाही'

author img

By

Published : Apr 21, 2020, 4:19 PM IST

पालघर येथे घडलेल्या मॉब लिंचिंगच्या प्रकारानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी तीव्र शब्दात राग व्यक्त केला आहे. सभ्य समाजात बीभत्स आणि सहिष्णुता असता कामा नये, असे अख्तर यांनी म्हटलंय.

JAVED-AKHTAR-
जावेद अख्तर

मुंबई - कोरोना व्हायरसनंतर देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यात झालेल्या ३ लोकांच्या हत्येनंतर प्रकरण तापले आहे. अत्यंत क्रूरपणे तिघाजणांची हत्या जमावाने केल्याची घटना घडली. त्यानंतर याचे प्रतिसाद देशभर उमटत आहेत. या घटनेबद्दल बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपला राग व्यक्त केला. प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनीही आपली बाजू मांडली आहे.

  • Those who are responsible for the lynching of the two seers and their driver should not be spared at any cost .There shouldn’t be any tolerance for a barbaric and heinous crime like lynching in a civilised society .

    — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) April 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Those who are responsible for the lynching of the two seers and their driver should not be spared at any cost .There shouldn’t be any tolerance for a barbaric and heinous crime like lynching in a civilised society .

— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) April 20, 2020

जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर लिहिलंय, ''दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येला जे लोक जबाबदार आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले नाही पाहिजे. सभ्य समाजात बीभत्स आणि सहिष्णुता असता कामा नये.''

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या सिमेवरील भागात लॉकडाऊनच्या काळात तिघाजणांची हत्या जमावाने केली होती. हे लोक अंत्यसंस्कारासाठी जात असताना ही घटना घडली. या लोकांना चोर समजून लोकांनी क्रूरपणे ठार मारले होते.

जावेद अख्तर यांच्या बरोबरच बॉलिवूडच्या अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. यात अभिनेता फरहान अख्तर, अभिनेता अनुपम खेर, डायरेक्टर अनुराग कश्यप यांचा समावेश आहे.

मुंबई - कोरोना व्हायरसनंतर देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यात झालेल्या ३ लोकांच्या हत्येनंतर प्रकरण तापले आहे. अत्यंत क्रूरपणे तिघाजणांची हत्या जमावाने केल्याची घटना घडली. त्यानंतर याचे प्रतिसाद देशभर उमटत आहेत. या घटनेबद्दल बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपला राग व्यक्त केला. प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनीही आपली बाजू मांडली आहे.

  • Those who are responsible for the lynching of the two seers and their driver should not be spared at any cost .There shouldn’t be any tolerance for a barbaric and heinous crime like lynching in a civilised society .

    — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) April 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर लिहिलंय, ''दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येला जे लोक जबाबदार आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले नाही पाहिजे. सभ्य समाजात बीभत्स आणि सहिष्णुता असता कामा नये.''

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या सिमेवरील भागात लॉकडाऊनच्या काळात तिघाजणांची हत्या जमावाने केली होती. हे लोक अंत्यसंस्कारासाठी जात असताना ही घटना घडली. या लोकांना चोर समजून लोकांनी क्रूरपणे ठार मारले होते.

जावेद अख्तर यांच्या बरोबरच बॉलिवूडच्या अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. यात अभिनेता फरहान अख्तर, अभिनेता अनुपम खेर, डायरेक्टर अनुराग कश्यप यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.