ETV Bharat / city

केंद्राशी जवळीक असणाऱ्यांना पद्म पुरस्कार, विरोधकांचा आरोप - पद्म पुरस्कार

पद्म पुरस्कार सन्मानासाठी राज्यकडून 99 लोकांची शिफारस करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारकडून त्या नावांचा विचार केला गेला नसल्याचा आरोप आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय.

काँग्रेस नेते सचिन सावंत
काँग्रेस नेते सचिन सावंत
author img

By

Published : Jan 26, 2021, 10:24 PM IST

मुंबई - पद्म पुरस्कार सन्मानासाठी राज्यकडून 99 लोकांची शिफारस करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारकडून त्या नावांचा विचार केला गेला नसल्याचा आरोप आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय. तसेच केंद्राशी जवळीक असणाऱ्यांना पद्म पुरस्कार देण्यात आला, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. केंद्राने देशातील विविध क्षेत्रातील नामवंत 119 व्यक्तींना पद्म भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. राज्यसरकारने शिफारस केलेल्या पैकी केवक सिंधुताई सपकाळ यांनाच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सिंधुताई सपकाळ यांची देखील पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस राज्यसरकारने केली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांना देखील पद्म पुरस्कार देण्यात यावा, अशी शिफारसही करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारकडून त्यांच्या नावाचा देखील विचार केला गेला नाही. महाराष्ट्रातून केवळ सहा जणांना पद्म पुरस्कारांनी यावेळी सन्मानित करण्यात आले आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत
केंद्राच्या जवळीक असणाऱ्यांनाचं पद्म पुरस्कार-केंद्राच्या जवळीक असणाऱ्यांना पद्म पुरस्कार देण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. राज्याकडून 99 नावांची शिफारस करण्यात आली होती. मात्र त्या शिफारशीला केंद्राने किंमत दिलेला नाही. रजनीकांत श्रॉफ यांना केंद्राने पद्म पुरस्कार दिला. रजनीकांत श्रॉफ हे युनाईट्स फॉस्फरस लिमिटेड कंपनीचे सीएमडी आहेत. या कंपनीचा भाजप सोबत जवळच संबंध असून या कंपनीवर निवडणूक काळात निवडणूक आयोगाने धाड टाकली होती. या कंपनीतून अनधिकृत प्रचार साहित्य देखील सापडले असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पद्म पुरस्कारांचे नेमके निकष काय? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. राज्यसरकाने शिफारस केलेली नावे- महाविकास आघाडीने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 99 जणांच्या नावांची शिफारस केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचंही नाव होतं. ‘सिरम’चे अदर पूनावाला, दिग्गज अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सुबोध भावे यांचीही नावं पाठवण्यात आली होती.
शिवसेना नेते संजय राऊत

महाराष्ट्रात किमान दहा ते बारा लोकांचा सन्मान व्हायला हवा- संजय राऊत

"पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली, महाराष्ट्राला फक्त सहा पद्म पुरस्कार मिळाले याचं आश्चर्य वाटतं. इतका मोठा महाराष्ट्र आहे इतका मोठं योगदान आम्ही देशाला आणि जगाला देत असतो. कोविड लसीमुळे देशाची मान उंचावली ती महाराष्ट्रात निर्माण झाली. केंद्र सरकार जे मान उंचावून चालत आहेत ते महाराष्ट्र मुळेचं. महाराष्ट्रात किमान दहा ते बारा लोकांचा सन्मान व्हायला हवा होता. पद्म पुरस्कारांमध्ये देखील मनमानी होते का? महाराष्ट्राच्या वाट्याला जर अन्याय येत असेल तर नक्कीच त्याची नोंद घ्यावी लागेल, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा- किसान ट्रॅक्टर मार्च : हिंसाचारानंतर मोर्चा स्थगित; शेतकऱ्यांना सीमेवर परतण्याचे निर्देश..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.