मुंबई - गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केलेले वादग्रस्त विधान विरोधकांच्या अंगलट आहे. सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत, माफी मागावी, अशी भूमिका लावून धरली. (Controversial statement of Padalkar) सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकपणामुळे पडळकर यांनी अखेर अनावधानाने चुकीचे व्यक्त झाल्याचे सांगत दिलगीरी व्यक्त केली. त्यामुळे या वादावर पडदा पडला, मात्र दोन वेळा सभागृह उप सभापतींना तहकूब करावे लागले.
शरद पवार यांच्यावरही फडणवीस यांनी निशाणा साधला
कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 260 अन्वये प्रस्ताव चर्चेसाठी मांडला. भाजपचे विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. (LIVE LEGISLATIVE COUNCIL SESSION 2022) राजकीय नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे कटकारस्थान सुरु आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भंडाफोड केला आहे. शरद पवार यांच्यावरही फडणवीस यांनी निशाणा साधला. हाच धागा पकडून पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेत आक्षेपार्ह विधाने केले. गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधान परिषेदत गुन्ह्याचा पाढा वाचला. परंतु, माझ्यावरील गुन्हे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी दाखल झाले आहेत. बेड्या देखील शेतकऱ्यांसाठी पडल्याचा मला अभिमान आहे, असे सांगितले.
पडळकरांचे शब्द पटलावरुन काढून टाकायची मागणी
गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी यावर आक्षेप घेतला. संबंधितांवर कोणत्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे, हे मला पुन्हा सभागृहाला सांगावे लागेल, असे स्पष्ट केले. पडळकरांचे शब्द पटलावरुन काढून टाकायची मागणी केली. उपसभापतींनी यात हस्तक्षेप करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील शंभूराजे यांच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्याने गदारोळ झाला. दिलगिरी व्यक्त करत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा पवित्रा सत्ताधाऱ्यांनी घेतला. त्यामुळे सुरुवातीला दहा तर नंतर सात मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.
पडळकर यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी
कामकाजाला पुन्हा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दोन्ही बाजूच्या सदस्यांना समज देण्याची मागणी केली. तर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेच्या कायद्यांची जाणीव करुन देत, गोपीचंद पडळकर यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी, असे सूचित केले. तसेच, प्रत्येक सभासदाने बोलताना, भाषेवर संयम ठेवावा अशी सूचना केली. पडळकर यांनी अनावधानाने झाल्याचे मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. तसेच कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, असे सांगितले. वादावर यामुळे पडदा पडला.
हेही वाचा - LIVE : अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 विधानपरिषदेतून थेट प्रक्षेपण