मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. या परिस्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, औषधांचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था पुढे येत असून रुग्णांची मदत करत आहेत. मुंबईतल्या जुमा मस्जिदने एक स्तूत्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमात ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. त्यांना आत्तापर्यंत ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक स्तरातून या कार्यात कौतुक होत आहे.
जुमा मस्जिदच्या कार्यकारिणीतील व्यवस्थापक सांगतात -
आत्तापर्यंत आम्ही हजारो रुग्णांना मोफत ऑक्सिजन किट ऑक्सिजन सिलेंडर दिलं आहे. या सिलेंडर चे कोणतेही चार्ज अथवा डिपॉझिट स्वीकारले नाही. येणारा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा, पंताचा आहे, याची कोणतीही विचारणा केली जात नाही. त्याची गरज ऑक्सिजनची असून ती भागवली जाते. सध्यारुग्णालयामध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतोय. रुग्णालयाच्या प्रशासनाकडून आम्हाला फोन येत आहेत, जर तुमच्याकडे ऑक्सिजन उपलब्ध असेल तर आम्हाला द्या सहकार्य करा. आपले राज्य सरकारदेखील या दृष्टीने प्रयत्न करत आहे. आम्ही देखील या कामात एक खारीचा वाटा उचलत असल्याचे व्यवस्थापक शोएब खातिब सांगतात.