ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये एमआयएमकडून आमदार जलील मैदानात, तर सोलापुरात भाजपने राबवला यूपी पॅटर्न - स्टार प्रचारक

वंचित आघाडी निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या, निकालानंतर होतील अदृश्य - शिवसेनेची टीका... तर भाजपचे कमळ औषधालाही शिल्लक राहणार नाही, राजू शेट्टींचा भाजपवर घणाघात... रेल्वेमध्ये बसून अर्ज दाखल करायला येईल असे मी म्हणालेच नव्हते - प्रीतम मुंडेंचे वक्तव्य या सारख्या इतर काही राजकीय घडामोडींचा आढावा वाचा थोडक्यात....

लोकसभा निवडणुकीतील राजकीय घडामोडी
author img

By

Published : Mar 26, 2019, 12:44 PM IST

Updated : Mar 26, 2019, 1:58 PM IST

नागपुरातून २७, तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून २२ उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून २७ उमेदवारांचे ३४ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, तर रामटेक येथून २२ उमेदवारांनी २९ अर्ज भरल्याची माहिती पुढे आली आहे. २८ मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेटवची तारीख आहे.वाचा सविस्तर

वंचित आघाडी निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या, निकालानंतर होतील अदृश्य - शिवसेना

मुंबई - वंचितांची म्हणून जी काही आघाडी निर्माण झाली आहे त्याविषयी न बोललेलेच बरे. निवडणुकीपुरत्या उगवलेल्या त्यांच्या छत्र्या निकालानंतर अदृश्य झालेल्या दिसतील, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे.या वेळी राज्यात 48 पैकी किमान 45 जागा आम्ही नक्कीच जिंकू. विरोधक निदान औषधासाठी तरी शिल्लक ठेवायला हवेत, म्हणून आम्ही 3 जागा महाआघाडीवाल्यांना देत आहोत. आता या 3 जागा कोणत्या, ते निकालानंतरच कळेल, अशी अपेक्षा शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून व्यक्त केली आहे.वाचा सविस्तर

उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकरांचा अर्ज दाखल; गट-तट संपल्याचा शिवसेनेचा दावा

उस्मानाबाद - उस्मानाबाद मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आला. उमेदवार ओम राजे निंबाळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत नामनिर्देशन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना उप-नेते आमदार तानाजी सावंत, शंकर बोरकर, कैलास पाटील यांच्या उपस्थित होते.वाचा सविस्तर

औरंगाबाद लोकसभा : एमआयएमकडून आमदार जलील रिंगणात, ओवैसींची घोषणा

हैदराबाद - एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आमदार इम्तियाज जलील यांची औरंगाबादमधून उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे औरंगाबाद मतदारसंघातील चुरस चांगलीच वाढली आहे. विद्यमान खासदार खैरे यांच्यासह आता ३ आमदार लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.वाचा सविस्तर

औषधालाही कमळ शिल्लक राहणार नाही, राजू शेट्टींचा भाजपवर घणाघात

सोलापूर - महाराष्ट्रात असे तणनाशक फवारणार आहे, ज्यामुळे औषधाला सुद्धा कमळ दिसणार नाही. असा घणाघात स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसेच चौकीदार चोर म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मला शहाणपणा शिकवू नये, असा इशारा त्यांनी ठाकरेंना दिला. कोल्हापूरमधल्या महायुतीच्या प्रचारामध्ये केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे प्रत्युतर दिले आहे.वाचा सविस्तर

हिम्मत असेल तर शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवावी, देशमुखांचे आव्हान

मुंबई - राज्याच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघ चर्चेचा विषय झाला आहे. या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकीय आव्हान प्रतिआव्हानांचा खेळ रंगू लागलाय. माढ्याचे राजकारण तापत असताना सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना आव्हान दिले आहे. हिम्मत असेल तर पवारांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढवूनच दाखवावी, असे आव्हान त्यांनी केले आहे. वाचा सविस्तर

काँग्रेसकडून ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; राहुल, सोनिया, प्रियांकासह विखे पाटलांचा समावेश

मुंबई - काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सोनिया गांधीसह प्रियांका गांधींचाही समावेश आहे. तसेच राज्यात खासदार अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

दुसऱ्या टप्प्यातील अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई - दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज(मंगळवार) शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातील बीड, अकोला, हिंगोलीसहअन्य ७ मतदारसंघातील उमेदवार अर्ज भरणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदार संघात निवडणुक होणार आहे.वाचा सविस्तर

परभणी लोकसभेसाठी आतापर्यंत १३ उमेदवारी अर्ज दाखल, वंचित बहुजनसह भाकपही रिंगणात

परभणी - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. कालपर्यंत एकूण १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजन क्षीरसागर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान यांनी अर्ज दाखल केले.वाचा सविस्तर

स्वामींना संधी म्हणजे योगी आदित्यनाथप्रमाणे यूपी पॅटर्न..

सोलापूर - भारतीय जनता पक्षाने सोलापूर लोकसभेच्या आखाड्यात यूपी पॅटर्न आणला आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना डावलून लिंगायत धर्माचे गुरु डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरविले आहे. त्यामुळे सर्वांना तो योगी आदित्यनाथ प्रमाणे भाजपचा यूपी पॅटर्न वाटतो आहे.वाचा सविस्तर

वसंतदादा घराण्यावर अन्याय करून 'सांगली' नको, वाद मिटवण्यासाठी राजू शेट्टींचा आजचा अल्टीमेटम

सांगली- मंगळवारपर्यंत (२६ मार्च) सांगलीचा वाद मिटवा, अन्यथा महाआघाडीतून बाहेर पडू, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सांगलीच्या जागेबाबत आम्ही आग्रही नसून बुलडाणा किंवा शिर्डीची जागा चालेल. पण या वादात स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगलीची जागा घेणार नाही आणि वसंतदादाच्या घराण्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली आहे.वाचा सविस्तर

देशाला पंतप्रधान देणाऱ्या रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण मारणार 'बाजी'

नागपूर - देशाच्या राजकीय इतिहासात महत्वाचा ठसा उमटविणारा लोकसभा मतदारसंघ म्हणून रामटेक मतदारसंघाची ओळख आहे. कारण भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे या मतदारसंघातून निवडणूक आले होते. नरसिंहराव यांनी दोन वेळेस या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. २०१४ ला या मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाणेंनी बाजी मारली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी पराभव झाला होता. यावेळी काँग्रेसने किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेनेने पुन्हा कृपाल तुमाणे यानांच मैदानात उतरवले आहे.वाचा सविस्तर

वर्ध्यात दुहेरी लढतीचा इतिहास, काँग्रेसचा गड सध्या भाजपच्या ताब्यात

वर्धा - लोकसभेच्या वर्धा मतदार संघात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जस-जशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे, तस-तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यातील इतिहास पाहता गांधीजींच्या आणि भूदान प्रणेते विनोबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा म्हणून देशभरात ओळखला जातो. अनेक वर्ष इथे काँग्रेसने सत्ता गाजवली आहे. मात्र, काँग्रेसची अवस्था सध्या खिळखिळी झाल्याने या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. वाचा सविस्तर

रेल्वेमध्ये बसून अर्ज दाखल करायला येईल असे मी म्हणालेच नव्हते - प्रीतम मुंडे

बीड - २०१९ मध्ये रेल्वेत बसून बीड लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी बीडला येईल, असे मी कधीच म्हणाले नव्हते, विरोधक जाणीवपूर्वक रेल्वेच्या संदर्भाने माझ्यावर टीका करत आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सोलापूरवाडीपर्यंत नगर, बीड, परळी, रेल्वे आणली आहे, असे बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले. सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर रेल्वेच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले होते. विरोधकांच्या टीकेला प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जाहीर सभेतून उत्तर दिले आहे.वाचा सविस्तर

रवींद्र गायकवाड यांचेही बंड झाले थंड; शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करणार

मुंबई - उस्मानाबाद मतदार संघात शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने गायकवाड बंडाच्या तयारीत होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा भेट झाल्यानंतर गायकवाड यांचे बंड थंड झाले. गायकवाड सेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर

यवतमाळमध्ये उमेदवारासाठी जनतेचा निधी, वैशाली येडेंसाठी प्रहारने फिरवली झोळी

यवतमाळ - बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने यवतमाळ साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांना यवतमाळ - वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चासाठी प्रहारने निधी संकलन मोहिम राबवली. यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये झोळी घेऊन लोकांकडून पैसे गोळा केले.वाचा सविस्तर

Intro:Body:

वंचित छत्र्या निकालानंतर अदृश्य होतील..ठाकेरंची टीका, औरंगाबादमध्ये एमआयएमकडून आमदार जलील रिंगणात, तर परभणीत उयनरांजेंची उपस्थिती..

वंचित आघाडी निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या, निकालानंतर होतील अदृश्य  - शिवसेना

मुंबई - वंचितांची म्हणून जी काही आघाडी निर्माण झाली आहे त्याविषयी न बोललेलेच बरे. निवडणुकीपुरत्या उगवलेल्या त्यांच्या छत्र्या निकालानंतर अदृश्य झालेल्या दिसतील, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे.या वेळी राज्यात 48 पैकी किमान 45 जागा आम्ही नक्कीच जिंकू. विरोधक निदान औषधासाठी तरी शिल्लक ठेवायला हवेत, म्हणून आम्ही 3 जागा महाआघाडीवाल्यांना देत आहोत. आता या 3 जागा कोणत्या, ते निकालानंतरच कळेल, अशी अपेक्षा शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून व्यक्त केली आहे.

औरंगाबाद लोकसभा : एमआयएमकडून आमदार जलील रिंगणात, ओवैसींची घोषणा

हैदराबाद - एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आमदार इम्तियाज जलील यांची औरंगाबादमधून उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे औरंगाबाद मतदारसंघातील चुरस चांगलीच वाढली आहे. विद्यमान खासदार खैरे यांच्यासह आता ३ आमदार लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

Conclusion:
Last Updated : Mar 26, 2019, 1:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.