मुंबई - लॉकडाऊनच्या काळामध्ये राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून योग्य ती व्यवस्था करण्यात येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बिहारसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनने जाण्यासाठी शेकडो परप्रांतीय नागरिकांनी स्टेशन बाहेर गर्दी केली. त्यामुळे या परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
या दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला होता. मात्र असे असतानाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर सोशल डिस्टन्सिंगचे फज्जा उडालेला आहे. ज्यांनी पोलीस ठाण्यात नोंदणी केली आहे, त्यांना पोलिसांकडून बोलविण्यात आले होते. मात्र नोंदणी न झालेल्या नागरिकांनी सुद्धा गर्दी केल्याने प्रवाशांची संख्या वाढली. छत्रपती शिवाजी महाराज टार्मिनस येथून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.