ETV Bharat / city

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची खलबते; दिग्गज नेत्यांची उपस्थिती

author img

By

Published : Jun 16, 2019, 12:32 PM IST

Updated : Jun 16, 2019, 5:24 PM IST

राज्य विधिमंडळाचे अखेरचे अधिवेशन उद्या, सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक झाली.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची खलबते सुरू

मुंबई - पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील विरोधीपक्ष नेत्याची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे नेते हजर होते.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधानसभा गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, सपाचे नेते आमदार अबु आझमी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार कपिल पाटील, आमदार भास्करराव जाधव, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे, आमदार रामहरी रुपनवार उपस्थित होते.

राज्य विधिमंडळाचे अखेरचे अधिवेशन -

राज्य विधिमंडळाचे अखेरचे अधिवेशन उद्या, सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षांची ही बैठक झाली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी गटनेत्यांची बैठक आज सकाळी ११ वाजता सुरू झाली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी-४ या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू होत आहे. राज्यातील दुष्काळ, मंत्र्यांचा कथित भ्रष्टाचार, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, शिक्षणातील गोंधळ, आरक्षणाचे रखडलेले प्रश्न यावर विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरण्याची रणनीती या बैठकीत आखण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभय सभागृहाचे विरोधी पक्षनेते, गटनेते आणि ज्येष्ठ सदस्यांना पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी दुपारी चर्चा व चहापानासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आमंत्रित केले आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यालाच भाजपने फोडल्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकण्याची चिन्हे आहेत.

Intro:पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची बैठक सुरु.. Body:पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची बैठक सुरु..

मुंबई, ता. 16 :

पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील विरोधीपक्ष नेत्याची बैठक सुरू झाली आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, सपाचे नेते आमदार अबु आझमी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार कपिल पाटील, आमदार भास्करराव जाधव,आमदार हेमंत टकले,आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे,आमदार रामहरी रुपनवार उपस्थित.Conclusion:पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची बैठक सुरु..
Last Updated : Jun 16, 2019, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.