ETV Bharat / city

Ajit Pawar : अजित पवारांचा शिंदे-भाजप सरकारला टोमणा; म्हणाले, 'सभागृहात एक बोलायचे...'

मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आम्ही मागच्या सरकारने घेतलेले निर्णय सरसकट रद्द करणार नाही. मात्र, डीपीडीसीने मंजूर केलेली काम ( Dpdc Work Cancelled ) रद्द केली आहेत, असे अजित पवार यांनी म्हटलं ( Ajit Pawar Taunt Shinde Bjp Government ) आहे.

author img

By

Published : Jul 4, 2022, 8:57 PM IST

Updated : Jul 4, 2022, 9:03 PM IST

Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबई - बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विधानसभेत बहुमत चाचणी पार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधात बसावे लागणार आहे. तर, विरोधी पक्ष नेते म्हणून आज ( 4 जुलै ) माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांची एकमताने निवड झाली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले आम्ही मागच्या सरकारने घेतलेले निर्णय सरसकट रद्द करणार नाही. परंतु, रविवारी ( 3 जुलै ) जीआर काढून डीपीडीसीने मंजूर केलेली काम रद्द केली आहेत. याला काय म्हणायचे, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला ( Ajit Pawar Taunt Shinde Bjp Government ) आहे.

"विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी माझ्यावर?" - याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, दोन दिवसीय अधिवेशन विधानसभेचे घेण्यात आले होते. ते आज संपले आहे. अध्यक्षांची निवड व विश्वास दर्शक ठराव या दोन्ही गोष्टी पार पडल्या आहेत. परंतु, न्यायालयात ज्या गोष्टी प्रलंबित आहेत याचा निर्णय होईलच आणि आम्ही त्याची प्रतीक्षा करत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वास दर्शक ठरावादरम्यान बरेचसे उमेदवार उपस्थित होते. विरोधी पक्ष नेत्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेते आमच्याकडेच येणार होते. माझी त्यासाठी निवड करण्यात आली आहे.

"जनतेच्या भल्यासाठी नेहमीच सहकार्य" - आताची माझी जबाबदारी वेगळी आहे. कारण लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याप्रमाणे विरोधी पक्ष नेत्यांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची असते. मी गेल्या 32 वर्षांपासून राजकीय क्षेत्रात काम करत आहे. परंतु, आत्ताची गोष्ट लक्षात घेता ही जबाबदारी फार मोठी आहे. त्यातच आपल्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेत्यांची जबाबदारी खूप मोठी आहे. यापूर्वी अनेक मान्यवरांनी हे पद भूषविले आहे. सदरची जबाबदारी योग्य व यशस्वीपणे पार पाडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील, हा मला विश्वास आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला द्यायचा आहे. जनतेच्या भल्यासाठी जे काही निर्णय असतील त्यात नेहमीच आमचे सहकार्य राहील, असेही पवार यांनी म्हटलं आहे.

"शिवसेनेच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप नाही?" - आमच्या सरकारने सीएनजीच्या दरात टॅक्स कमी केले होते. यंदाच्या वर्षी जीएसटीचे उत्पन्न जास्त आलेले आहे. शिंदे भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार असल्याचे सांगितले आहे. पण, हे दर कमी केल्याने सरकारवर किती कर्जाचा बोजा वाढणार आहे हे वेळच ठरवेल. शिवसेना अंतर्गत जे काही प्रश्न आहेत ते शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सोडवतील. त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा आम्हाला अधिकार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

"मी निधीबाबत कुठलाही भेदभाव केला नाही?" - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी माझ्यावर आरोप केले की त्यांना निधी मिळत नव्हता. त्यांच्यावर अन्याय झाला. नव्या सरकारने त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत. मी, आज सांगतो की मी कधीही निधी देण्याबाबत भेदभाव केला नाही. याबाबत मी सभागृहामध्ये माझी भूमिका स्पष्ट मांडली आहे. आज सर्व मान्यवरांनी मान्य केले की अजित पवार यांनी कुठेही निधीबाबत भेदभाव केला नाही आहे, असे सांगत अजित पवार यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या आरोपांच खंडन केल आहे.

"सभागृहात एक बाहेर एक बोलायचे?" - 2014 मध्ये शिवसेनेला किती मंत्रीपदी मिळाली होती हे देखील विचारात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कालच ( 3 जुलै ) सरकारने जीआर काढून डीपीडीसीने मंजूर केलेली कामे रद्द केली आहेत. म्हणजे सभागृहात एक बोलायचे आणि बाहेर येऊन वेगळे करायचे, असे अजित पवारांनी शिंदे-भाजप सरकारला टोमणा मारला आहे.

हेही वाचा - CM On VAT Of Petrol : जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करु - मुख्यमंत्री

Last Updated : Jul 4, 2022, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.