ETV Bharat / city

Ajit Pawar Meet CM : अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट; 'या' मुद्यांवर झाली चर्चा

पुरामुळे नुकसान झालेले शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विरोधीपक्षाचे नेते व विधीमंडळ सदस्यांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार ( opposition leader ajit pawar ) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ( Deputy CM Devendra Fadnavis ) आज ( बुधवारी ) सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन निवेदन दिले.

Ajit Pawar Meet CM
Ajit Pawar Meet CM
author img

By

Published : Aug 3, 2022, 5:00 PM IST

मुंबई - विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विरोधीपक्षाचे नेते व विधीमंडळ सदस्यांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार ( opposition leader ajit pawar ) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ( Deputy CM Devendra Fadnavis ) आज ( बुधवारी ) सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन निवेदन दिले. राज्यात अनेक ठिकाणी असलेली पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा केला होता. अजित पवार यांनी दौऱ्यादरम्यान बाधित शेतकऱ्यांना त्वरित 75 हजार रुपयाची मदत करण्यासंदर्भात देखील मागणी केली.

मंत्रिमंडळ विस्ताराची केली मागणी : राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन होऊन जवळपास 35 दिवस होत आले असले तरी राज्याला अजुन मंत्रिमंडळ मिळालेले नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असेच राज्याचा गाडा हाकत आहेत. यामुळे अतिवृष्टी बाधित नागरिक आणि शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असून लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील समस्या त्वरित सोडवाव्यात मदत होईल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी मागणी अजित पवार यांनी या भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - Supreme Court hearing : नवीन पक्ष बनवला नाही तर तुम्ही आहात कोण? सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.