मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज सोमवारी 5203 तर आतापर्यंत एकूण 1 लाख 19 हजार 410 लस देण्यात आली. त्यात 91,627 आरोग्य आणि 27,783 फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. आजपासून लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली मात्र लाभार्थ्यांनी पाठ फिरवल्याने फक्त 71 जणांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी -
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लसीकरणाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 22 लसीकरण केंद्रांवर 104 बूथवर 5200 आरोग्य कर्मचारी तर 5200 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 10,400 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 1593 आरोग्य कर्मचारी तर 3610 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 5203 जणांना लस देण्यात आली. आज 4 जणांना सौम्य दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मुंबईत आतापर्यंत 1 लाख 19 हजार 410 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
दुसरा डोस घेण्याकडे फिरवली पाठ
मुंबईत 16 जानेवारीला पहिली लस देण्यात आली. त्यावेळी 4 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 1926 लाभार्थ्यांना लस देण्यात आली होती. या लाभार्थ्यांना आज 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा होता. मात्र 1926 पैकी फक्त 71 लाभार्थ्यांनीच दुसरा डोस घेतल्याने लाभार्थ्यांनी पहिल्या प्रमाणेच दुसऱ्या डोसच्यावेळीही पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत कस्तुरबा हॉस्पिटल 927, नायर हॉस्पिटल 15606, जेजे हॉस्पिटल 891, केईएम 14529, सायन हॉस्पिटल 6679, व्ही एन देसाई 1812, बिकेसी जंबो 11557, बांद्रा भाभा 5469, सेव्हन हिल हॉस्पिटल 8092, कूपर हॉस्पिटल 9495, गोरेगाव नेस्को 4628, एस के पाटील 1482, एम डब्लू देसाई हॉस्पिटल 894, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल 13211, दहिसर जंबो 1339, भगवती हॉस्पिटल 1038, कुर्ला भाभा 368, सॅनिटरी गोवंडी 1626, बीएआरसी 917, माँ हॉस्पिटल 1089, राजावाडी हॉस्पिटल 14194, वीर सावरकर 1390, मुलुंड जंबो 2006 अशा एकूण 1 लाख 19 हजार 339 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
मुंबईत फक्त 71 लाभार्थ्यांनी घेतला लसीचा दुसरा डोस - vaccine
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज सोमवारी 5203 तर आतापर्यंत एकूण 1 लाख 19 हजार 410 लस देण्यात आली.