ETV Bharat / city

माऊंट मेरी चर्चमध्ये नाताळ साजरा, केवळ 50 जणांना प्रवेशाची मुभा

माऊंट मेरी चर्चमध्ये नाताळ मोठा उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी केवळ 50 जणांना चर्चमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

author img

By

Published : Dec 25, 2020, 9:40 AM IST

MOUNT MERRY CHURCH NEWS
मुंबई माऊंट मेरी चर्च

मुंबई - माऊंट मेरी चर्च हे मुंबई शहरातील एक प्रसिद्ध चर्च आहे. दरवर्षी या चर्चमध्ये नाताळ मोठा उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचा परिणाम नाताळवरही पाहायला मिळत आहे. गरुवारी आणि शुक्रवारी चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणेच मोठी सजावट करण्यात आली. मात्र एका वेळी केवळ 50 जणांना चर्चमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. चर्चमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की दरवर्षी इथे हजारो श्रद्धाळु येतात मात्र यावर्षी कोरोनामुळे कमी लोकांना प्रवेशाची परवानगी दिली आहे. सेक्रेड हार्ट कॅथेड्रल चर्चमध्ये देखील कोरोनामुळे पहिल्यांदाच गर्दी कमी होती.

माऊंट मेरी चर्चमध्ये 50 जणांना प्रवेश
प्रवेशावर बंदीकोरोनामुळे प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. चर्चमध्ये केवळ सदस्यांनाच प्रार्थना आणि पूजा करण्यासाठी परवानगी आहे. त्यासाठी विशेष व्यवस्था केली गेली आहे. यासोबतच चर्चमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी बेंचवर खुणा करण्यात आल्या आहेत. विना मास्क कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तसेच चर्चच्या गेटवर एक बॉक्स ठेवण्यात आला आहे. त्यात श्रद्धाळु त्यांची प्रार्थना लिहुन टाकू शकतात. तर यंदा कुठल्याही व्हीआयपी व्यक्तीलाही निमंत्रण देण्यात आले नाही. गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.

हेही वाचा - लोणावळ्यात नाईट कर्फ्यू लागू; नाताळ आणि नववर्षानिमित्त निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.