ETV Bharat / city

लॉकडाऊन इफेक्ट : मुंबईत दहा दिवसांत फक्त 1 ऑनलाइन दस्तनोंदणी

दररोज कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या मुंबई नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या तिजोरीत 10 दिवसांत 500 रुपये ही जमा होऊ नये, असे इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.

Registration and Stamp Duty Department Mumbai
मुंबई नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग
author img

By

Published : May 11, 2020, 12:21 PM IST

मुंबई - महाराष्ट्राला दिवसाला कित्येक कोटींचा महसूल देणाऱ्या मुंबईच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या तिजोरीत सध्या दिवसाला एक रुपयाही जमा होत नसल्याचे चित्र आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे मालमत्ता व्यवहार पूर्णपणे ठप्प असल्याने दस्त नोंदणीच होताना दिसत नाही. त्यामुळेच मे महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात केवळ एक ऑनलाइन दस्तनोंदणी झाली असून यातून तिजोरीत केवळ 424 रुपये जमा झाले आहेत. दररोज कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या मुंबई नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या तिजोरीत 10 दिवसांत 500 रुपये ही जमा होऊ नये, असे इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.

हेही वाचा... मुंबईत कोरोनाचे 875 नवीन रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या 13 हजार 564वर

मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागातुन महाराष्ट्राला सर्वाधिक महसूल मिळतो. त्यातही महाराष्ट्रातुन मिळणाऱ्या महसुलाच्या 60 ते 65 टक्के महसूल हा केवळ मुंबईतुन जमा होतो. महिन्याला 400 ते 500 कोटी रुपये वा कधी त्याहूनही अधिक महसूल जमा होतो. परंतु आता लॉकडाऊन आणि कोरोनाचा मोठा फटका मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाला बसला आहे. सर्व व्यवहार बंद असल्याने सरकारला कुठूनच महसुल मिळत नसल्याने ऑनलाइन दस्तनोंदणीचा पर्याय आणण्यात आला. मात्र, घरखरेदी-विक्री व्यवहारच ठप्प असल्याने दस्तनोंदणी तरी कशी होणार ? हा प्रश्न आहे.

एप्रिलमध्ये 470 कोटी, मार्चमध्ये 377 कोटीचा महसूल मुंबईतुन मिळाला होता. तिथे एप्रिलमध्ये हा आकडा फक्त 43 हजार 547 रुपयांवर जाऊन अडकला. आता तर मे महिन्याच्या 10 दिवसात केवळ एक दस्तनोंदणी झाली असून त्यातून केवळ 424 रुपये मिळाले आहेत. लॉकडाऊन वाढवणार की उठणार हे अद्याप स्पष्ट नसल्याने मे महिना महसुलाविना कोरडाच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कोरोनाबरोबरच आर्थिक संकटही गडद होत आहे, असे म्हटले जात आहे.

हेही वाचा... मुंबई - आर्थररोड कारागृहातील आणखी 81 कैद्यांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.