ETV Bharat / city

तुटवडा ! मुंबईत केवळ 40 आयसीयू बेड व 14 व्हेंटिलेटर रिक्त - कोरोना रुग्णसंख्या

मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता जाणवत आहे. मुंबईत आयसीयूचे 40 तर व्हेंटिलेटरचे फक्त 14 बेड रिक्त आहेत. यामुळे आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे.

corona patient in mumbai
corona patient in mumbai
author img

By

Published : Apr 16, 2021, 7:54 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता जाणवत आहे. मुंबईत आयसीयूचे 40 तर व्हेंटिलेटरचे फक्त 14 बेड रिक्त आहेत. यामुळे आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. यासाठी येत्या 15 दिवसात 4 जम्बो कोविड सेंटर उभारली जाणार आहेत. त्यात 5 हजार 300 बेड आणि 800 आयसीयू असणार आहेत.

आयसीयू, व्हेंटिलेटरचा तुटवडा -

15 एप्रिलच्या आकडेवारीनुसार जम्बो कोविड सेंटर आणि इतर कोविड सेंटरमध्ये एकूण 26 हजार 906 खाटा आहेत. त्यापैकी 21 हजार 228 खाटांवर रुग्ण असून 5 हजार 678 खाटा रिक्त आहेत. पालिका सरकारी रुग्णालयात 20 हजार 044 खाटा आहेत. त्यापैकी 16 हजार 308 खाटांवर रुग्ण असून 3 हजार 736 खाटा रिक्त आहेत. ऑक्सिजनच्या 10 हजार 183 खाटा आहेत. त्यापैकी 8 हजार 962 खाटांवर रुग्ण असून 1 हजार 221 खाटा रिक्त आहेत. आयसीयूच्या 2 हजार 692 खाटा आहेत. त्यापैकी 2 हजार 652 खाटांवर रुग्ण असून 40 आयसीयू बेड रिक्त आहेत. व्हेंटिलेटरच्या 1 हजार 349 खाटा आहेत. त्यापैकी 1 हजार 335 बेडवर रुग्ण असून 14 बेड रिक्त आहेत. मुंबईत आयसीयूच्या आणि व्हेंटीलेटरच्या खाटा कमी प्रमाणात रिक्त आहेत. मात्र कोविड सेंटर, पालिका रुग्णालय, सरकारी रुग्णालयात 9 हजार खाटा रिक्त आहेत, त्यात ऑक्सिजनच्या 1 हजार 221 खाटा रिक्त आहेत.

रेमडेसिवीरचा मुबलक साठा -

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे या इंजेक्शनचा राज्यात तुटवडा आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे. मात्र मुंबई महापालिकेकडे 22 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आहे. 2 लाख इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे.

ऑक्सिजनचा योग्य पुरवठा -

मुंबईत रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. यासाठी पालिकेने ऑक्सिजन सिलेंडर ऐवजी मोठे टॅंक बसवले आहेत. मुंबई महापालिकेला एकच पुरवठादार ऑक्सिजनचा पुरवठा करत होता. आता तीन पुरवठादारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे पालिकेकडे कोणत्याही प्रकारे ऑक्सिजनची कमतरता राहणार नाही.

10 हजार 97 रुग्णांना डिस्चार्ज -

मुंबईत गुरुवारी कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 53 हजार 159 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 12 हजार 189 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 54 हजार 311 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 85 हजार 494 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 42 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 91 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 100 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 48 लाख 01 हजार 219 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -

मुंबईत बांद्रा, गोरेगाव, बोरोवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर घाटकोपर आदी भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या विभागात विशेष उपाययोजना राबवल्या जात आहेत.

18 लाख 43 हजार लाभार्थ्यांना लस -

मुंबईत आतापर्यंत एकूण 18 लाख 43 हजार 429 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 16 लाख 22 हजार 930 लाभार्थ्यांना पहिला तर 2 लाख 20 हजार 499 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 62 हजार 209 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 88 हजार 823 फ्रंटलाइन वर्कर्स, 7 लाख 16 हजार 965 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 5 लाख 75 हजार 432 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.