मुंबई : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ पुणे ( Maharashtra State Board of Higher Secondary Education Pune ) यांच्याकडून बारावीच्या 2023 या शैक्षणिक वर्षासाठी मार्च परीक्षेकरिता भरावयाचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ ( Online Application for 12th Exams) केलेली आहे. आता विद्यार्थ्यांना 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन आवेदन पत्र भरता येणार आहे. तसेच चलन डाऊनलोड करून बँकेत ते शुल्क देखील भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदतवाढ नियमित विद्यार्थ्यांच्या साठी आहे.
सरल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाद्वारे भरावयाचे अर्ज : दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना 2023 या शैक्षणिक वर्षासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढ महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांनी दिलेली आहे या मुदत वाढीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील बारावीच्या परीक्षेसाठी शास्त्र कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांसाठी अर्ज व शुल्क भरावयाच्या मुदत वाढलेल्या तारखा 22 ऑक्टोबर 2022 पासून ते 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत असणार आहे. या काळात विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन अर्ज भरावयाचे आहे. हे अर्ज सरल या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाद्वारे भरावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने आज 19 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत चलन डाऊनलोड करून चलन भरावयाचे आहे तसेच महाविद्यालयांनी उच्च माध्यमिक शाळांच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्क भरणा केल्याच्या पावत्या चलनासह विद्यार्थ्यांच्या यादा 11 नोव्हेंबर पर्यंत जमा करायला हव्यात.
उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी मंडळाची सूचना : विविध विभागानिहाय उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी खालील दिलेल्या विभागणीय बँकेच्या खात्यामध्ये भरणा करून चलनाची प्रत विद्यार्थ्यांच्या याद्या मुदतीत विभाग मंडळाकडे सादर कराव्यात. पुणे औरंगाबाद कोल्हापूर या विभागासाठी बँक ऑफ इंडिया वर्चुअल अकाउंट मुंबई नागपूर लातूर या विभागासाठी एचडीएफसी वर्चुअल अकाउंट तर अमरावती नाशिक कोकण या विभागासाठी ॲक्सिस बँक द्वारे चलन भरणा करायचा आहे. असे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.