ETV Bharat / city

एक प्रभाग एक सदस्य, मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेलाच फायदा - एक प्रभाग एक सदस्य

मुंबई महापालिकेत एक प्रभाग एक सदस्य ही पद्धत याआधीही लागू होती. आणि यापुढेही लागू राहणार आहे. यामुळे याचा फायदा सत्ताधारी शिवसेनेला होईल अशी शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

BMC
BMC
author img

By

Published : Sep 23, 2021, 8:27 PM IST

मुंबई - मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली जाणार आहे. राज्य शासनाकडून यासंदर्भात लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत एक प्रभाग एक सदस्य ही पद्धत याआधीही लागू होती. आणि यापुढेही लागू राहणार आहे. यामुळे याचा फायदा सत्ताधारी शिवसेनेला होईल अशी शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

भाजपाला फायदा होण्याची भीती
मुंबई महापालिकेत १९८७ पासून शिवसेनेची सत्ता आहे. या कार्यकाळात शिवसेनेचा भाजपा हा मित्रपक्ष होता. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाची सत्ता येताच २०१७ची निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना वेगळे लढले होते. त्यावेळी शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागा मिळाल्या होत्या. भाजपाला सत्ता मिळू नये म्हणून अपक्ष नगरसेवकांच्या सहाय्याने शिवसेनेने आपला महापौर बसवला आहे. त्यानंतर मनसेचे ६ नगरसेवक फोडून त्यांना शिवसेनेत घेऊन आपला महापौरपद जाणार नाही याची काळजी शिवसेनेने घेतली आहे. राज्यात महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यांच्या निवडणूका झाल्या. त्याठिकाणी एक प्रभागात तीन ते चार सदस्य असल्याने त्याचा फायदा विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला झाला. भाजपाच्या अधिक जागा निवडून आल्या. राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाला फायदा होईल अशी भीती होती. राज्य सरकारने मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून जाऊ नये, यासाठी मुंबईत एक प्रभाग एक सदस्य पद्धतीच ठेवली आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एक प्रभाग एक नगरसेवक ही पद्धत मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ही पद्धत कायम ठेवण्याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनील शिंदे यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारला फायदा
राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी घेण्यात आला. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली जाणार आहे. राज्य शासनाकडून यासंदर्भात लवकरच आद्यदेश काढण्यात असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काँग्रेसने यापूर्वीच वेगळी निवडणूक लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. या प्रकारामुळे आघाडीत बिघाडीची शक्यता भाजपकडून वर्तवली जात आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने घेतलेला प्रभाग रचनेच्या बदलाचा निर्णय एकत्रितपणे लढण्याचे संकेत आहेत. नगरविकास मंत्री शिंदे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. निर्णयामागे राजकीय उद्देश नाही, परंतु महाविकास आघाडी सरकारला सामावून घेण्याची संधी आहे, असे मत शिंदे यांनी मांडले.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना -97
भाजप-83
कॉंग्रेस-29
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 8
समाजवादीपक्ष - 6
मनसे- 1
एमआयएम -2

हेही वाचा - आगामी निवडणुकांसाठी वेळीच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र : राज्य निवडणूक आयुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.