ETV Bharat / city

महागाईचा भडका : अबकी बार मुंबईत डिझेल शंभरी पार - diesel price

मुंबईत गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढ चर्चेचा विषय बनला आहे. याआधीच पेट्रोल शंभरी पार गेल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक त्रस्त आहेत. त्यात आता डिझेलचे दरही वाढले आहेत. आज डिझेलच्या दारात 37 पैशांची वाढ झाल्याने डिझेलचा दर डिझेल 100 रुपये 25 पैसे इतका झाला आहे.

महागाईचा भडका
महागाईचा भडका
author img

By

Published : Oct 9, 2021, 2:09 PM IST

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किमती या आधीच शंभरी पार गेल्या आहेत. आता डिझेलचे दरही शंभरी पार गेले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सतत वाढत असल्याने महागाईमुळे सामान्य मुंबईकर नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईत आणखी वाढ होणार असल्याने मुंबईकरांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.

डिझेल शंभरी पार -

मुंबईत गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढ चर्चेचा विषय बनला आहे. याआधीच पेट्रोल शंभरी पार गेल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक त्रस्त आहेत. त्यात आता डिझेलचे दरही वाढले आहेत. आज डिझेलच्या दारात 37 पैशांची वाढ झाल्याने डिझेलचा दर डिझेल 100 रुपये 25 पैसे इतका झाला आहे. तर पेट्रोलचा दर 29 पैशांनी वाढल्याने पेट्रोलचा दर 109 रुपये 80 पैसे इतका झाला आहे. मुंबईत डिझेलचा दर शंभरी पार झाल्याने त्याचा फटका अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो सारख्या वाहनांना बसणार आहे. यामुळे महागाईत आणखी वाढ होणार असल्याने मुंबईकरांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.

तर दर कमी होऊ शकतात -

पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनावर केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कर लावले जात असल्याने त्याची किंमत शंभरी पार जाते. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या अखत्यारीत आणण्याची गरज आहेत. केंद्राने ३० आणि राज्य सरकारने ३० टक्के असा एकूण ६० टक्के जीएसटी लावला तरी मुंबईमध्ये पेट्रोल ३७ रुपयांनी आणि डिझले २८ रुपयांनी स्वस्त होऊ शकते. महाराष्ट्रात येणाऱ्या पेट्रोलवर आणि डिझेलवर राज्य सरकारकडून टॅक्स वर टॅक्स लावला जातो. त्यावर पुन्हा व्हॅट हा कर लावला जातो. १० ते १२ रुपये सरचार्ज लावला जातो. तर डिझेलवर ३ रुपये सरचार्ज लावला जातो. यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले दिसतात अशी माहिती इंधन दराबाबतचे एक्स्पर्ट असलेले केदार चांडक यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.