मुंबई - मुंबईत काल (गुरुवारी) पडलेल्या पावसामुळे मुलुंड येथील एका घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईत कुर्ला आणि इतर काही ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्याची नोंद झाल्याने सखल भागात काही वेळासाठी पाणी साचले होते.
पूर्व उपनगरात पावसाचा जोर
मुंबईत आज सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासात शहर विभागात 27.38 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 76.98 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 50.62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्याची नोंद झाल्याने काही सखल भागात काही वेळासाठी पाणी साचले होते. मात्र पाऊस सतत पडत नसल्याने या पाण्याचा निचरा झाला.
एकाचा मृत्यू
या पावसादरम्यान मुलुंड एल.बी.एस. मार्ग, कल्पादेवी पाडा, पांडुरंग शाळा, वायडे चाळ येथील कंपाऊंड वॉलची भिंत एका घरावर कोसळली. या दुर्घटना स्थळावरून ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला बाहेर काढून अग्रवाल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्या व्यक्तीचा हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दिलीप वर्मा असे या व्यक्तिचे नाव असून तो 35 वर्षाचा आहे.
हेही वाचा - पुढचे तीन दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याची माहिती