मुंबई : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंक वर मंगळवारी मध्यरात्री 2 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला (Bandra Worli Sea Link Road Accident होता. या प्रकरणातील आरोपीला काल भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी मुंबई पोलिसांकडून आरोपीची पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली (One day police custody of accused) आहे.
आरोपी भोईवाडा कोर्टात - वांद्रे वरळी सी लिंक रस्ता अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपी इरफान अब्दुल रहीम बीलकिया याला पोलिसांनी कलम 304 अंतर्गत अटक केली आहे. बुधवारी बीडब्ल्यूएसएलवर वेगवान एसयूव्हीची तीन अन्य थांबलेली वाहने आणि रुग्णवाहिकेला धडकल्याने 5 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले होते. आरोपी इरफान अब्दुल रहीम बिल्किया याला भोईवाडा कोर्टात पोलिसांनी हजर केले. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की - तो त्याचा मोबाईल फोन चार्जरला लावायचा प्रयत्न करत होता, तोच समोरच्या रस्त्यावरील दृश्य नजरेआड झाले, हा अपघात झाला.
कशी घडली घटना - मंगळवारी मध्यरात्री 2 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास, सिद्धार्थ जॉयल, रेहान पटेल, शेन फॉर्च्युनल आणि आलिया भाटीन हे चौघे प्रवास करत असलेल्या मारुती स्विफ्टचा टायर फुटला आणि गाडीने वांद्रे वरळी सी लिंकवरील दक्षिण मुंबईच्या दिशेने जात असलेल्या दुभाजकाला धडकली. स्विफ्टमधील जखमी प्रवाशांना डॉ. अंकुज तिन्हा आणि डॉ. शिवानी नायर मदत करत होते. तर सीसीटीव्ही मॉनिटरिंग रुममधील एका रक्षकाने अपघात पाहून सुरक्षा कर्मचारी आणि टोलनाका कर्मचाऱ्यांना सावध केले. त्यानंतर क्रेन पाठवण्यात आली. क्रेनने कारला पोल क्रमांक 76 ते 78 दरम्यान चौथ्या लेनमध्ये नेले. एक रुग्णवाहिकाही आली. टोलनाक्याचे सुरक्षारक्षक समोरून येणाऱ्या गाड्यांना बाजूला सारत (accused in Bandra Worli Sea Link Road Accident) होते.
लक्ष विचलित झाल्याने अपघात - पहाटे 2.53 वाजता आरोपी इरफान चालवत असलेली ह्युंदाई क्रेटा अचानक दुसऱ्या लेनमधून चौथीत आली. चार गाड्या थांबलेल्या दिशेने क्रेटा वेगाने येत असल्याचं पाहूने एका गार्डने थोडं पुढे सरकत चालकाला चौथी लेन टाळण्याचा इशारा केला. मात्र, भरधाव वेगात आलेल्या इरफानने आधी टोलनाका कर्मचाऱ्यांना धडक दिली, तर नंतर स्विफ्ट आणि इतर वाहनांवर तो धडकला. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की - तो मोबाईल चार्जिंग कॉर्ड जोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे लक्ष विचलित झाल्याने हा अपघात घडला.
पाच जण मृत - सिद्धेश कदम (36), साळवे (29), आणि टोलनाका सुरक्षारक्षक सत्येंद्र फौजदार (27), राजेंद्र राजपूत (40), गजराज राजपूत (40) या पाच जणांना नायर रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. या अपघातात अन्य आठ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नायर, लीलावती, सैफी आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, असे एका अधिकाऱ्याने (5 people died in Bandra Worli Sea Link accident) सांगितले.