ETV Bharat / city

One Avighna Park Fire : अविघ्न पार्क आगीची चौकशी करून कडक कारवाई करणार - पालिका आयुक्त

मुंबईतील लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली.या घटनेची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली. याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

One Avighna Park Fire
One Avighna Park Fire
author img

By

Published : Oct 22, 2021, 3:00 PM IST

Updated : Oct 22, 2021, 8:05 PM IST

मुंबई - मुंबईच्या करिरोड येथील वन अविघ्न पार्क इमारतीच्या 19 व्या मजल्यावर आग लागली. या दुर्घटनेत इमारतीवरून उडी मारल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अरुण तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून तो 30 वर्षाचा होता. या घटनेची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली. याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

लालबागमध्ये 60 मजली अविघ्न पार्क इमारतीला आग

एकाचा मृत्यू -

करी रोड येथील अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 19 व्या मजल्यावर सकाळी 11.50 च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि पालिकेचे अधिकारी दाखल झाले. इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र आग 19 मजल्यावर लागून वरच्या मजल्यावर पसरली. 21 व्या मजल्यावर त्याचा धूर पसरताच एका व्यक्तीने 21 व्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अरुण तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून तो 30 वर्षाचा होता, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा - वरळीत ६० मजली इमारतीला भीषण आग, बाराव्या मजल्याहून अशी खाली पडली व्यक्ती, बघा VIDEO

दोषी असतील त्यांच्यावर कारवाई -

दरम्यान आग लागलेल्या इमारतीला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान इमारतीमधील रहिवाशांनी येथे सुरू असलेल्या अनधिकृत कामांचा पाढा वाचून दाखवला. तसेच सोसायटी बनून दोन वर्षे झाली तरी अद्याप पाणी नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली. यावर कालच मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठीशी घालू नका, बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करा, असे आदेश पालिकेला दिले आहेत. त्यानुसार कोणालाही पाठीशी घालणार नाही. जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर पालिका, अग्निशमन दल कारवाई करेल. तसेच पोलिसांकडूनही याची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या इमारतीमधील सुरक्षा रक्षकांना योग्य ट्रेनिंग दिले असते तर वरून पडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवता आला असता, असे महापौर म्हणाल्या.

हे ही वाचा - VIDEO : थरारक! आग लागलेल्या इमारतीहून खाली कोसळली एक व्यक्ती

आगीची चौकशी -

या इमारतीला आग लागल्यावर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल येण्याआधीच एका व्यक्तीने 21 व्या मजल्यावरून उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये फायर ऑडिट होते का, फायर यंत्रणा काम करत होती का, इमारतीला ओसी होती का, याची चौकशी केली जाईल. या घटनेची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

Last Updated : Oct 22, 2021, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.