पैठण (औरंगाबाद) - समोर जी गर्दी आहे तीच सांगते बाळासाहेबांची खरी शिवसेना कुणाची आहे असे म्हणत, एकदा मी आश्वासन दिले तर ते पुर्ण करुनच थांबतो. तीथे मग मी स्वत:चही ऐकत नाही, अशी जोरदार भाषणची सुरवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठण येथील जाहीर सभेत केली. कॅबीनेट मंत्री संदिपान भुमरे यांनी त्यांच्या पैठण मतदारसंघाच्या वतीने शिंदे यांचा जाहीर सत्कार ठेवला, असता त्या आयोजित कार्यक्रमात ते सोमवारी (१२ सप्टेंबर)रोजी पैठणमध्ये आयोजित सभेत बोलत होते.
आमच्या लोकांना गद्दार आणि खोके म्हणण्यापेक्षा आपण आत्मपरिक्षण कराव. जनतेच्या मताशी, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रातरणा कोणी केली याचाही विचार करावा असा नाव नघेता शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. तसेच, अजित दादा सकाळी सहाला काम सुरू करतात अस कोणीतरी म्हणाले, त्यांना मी सांगतो हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत कामच करत असतो असा जोरदार पलटवार शिंदे यांनी यावेळी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी स्थानिक आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला. याबाबत एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. यावर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. “ही जबरदस्तीने पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही. ही सर्व प्रेमाने आलेली माणसं आहेत,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.