ETV Bharat / city

एकेकाळची प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी आर्थिक टंचाईत? - इंद्राणीने पैसे भरण्यासाठी मागितला वेळ

एकेकाळी इंद्राणी मुखर्जी दिवसाला लाखो रुपये खर्च करायची. मात्र आता इंद्राणी मुखर्जी आर्थिक टंचाईत असल्याची माहिती इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात दिली. कोर्टाकडून जामीन रक्कम भरण्यासाठी कमी रक्कम देण्यात यावी अशी विनंती इंद्राणी मुखर्जीेतर्फे कोर्टाला करण्यात आली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी आर्थिक टंचाईत?

author img

By

Published : May 20, 2022, 7:43 AM IST

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी गेल्या साडेसहा वर्षांपासून स्वतःच्या मुलीच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये आहे. एकेकाळी इंद्राणी मुखर्जी दिवसाला लाखो रुपये खर्च करायची. मात्र आता इंद्राणी मुखर्जी आर्थिक टंचाईत असल्याची माहिती इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात दिली. कोर्टाकडून जामीन रक्कम भरण्यासाठी कमी रक्कम देण्यात यावी अशी विनंती इंद्राणी मुखर्जीेतर्फे कोर्टाला करण्यात आली आहे.

मुकुल रोहतगींनी केला युक्तीवाद - इंद्राणी मुखर्जीला जामीन मिळण्याकरिता सर्वोच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना आपली बाजू मांडण्यासाठी उभ केले होते. मुकुल रोहतगी यांनीच इंद्राणी मुखर्जी सर्वोच्च न्यायालयमधून अनुभवाच्या कौशल्यावर जामीन मंजूर करून दिला. इंद्राणी मुखर्जीचा मुंबई उच्च न्यायालयामध्ये 6 वेळा जामीन फेटाळला होता. मात्र इंद्राणी मुखर्जी सातव्यावेळी लकी ठरली असून तिला सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मात्र तिला भारत सोडून जाता येणार नाही अशा अनेक अटींसह सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

पैसे भरण्यासाठी मागितला वेळ - इंद्राणी मुखर्जीला 2 लाखांच्या जात मुचलक्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. रक्कम भरण्यास 2 महिन्यांचा वेळ मिळावा अशीही मागणी इंद्रायणीच्या वकीलांनी केला आहे. 6.5 वर्षांपासून इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये आहे. त्यामुळे रक्कम भरण्यास वेळ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

शिना बोरा हत्या प्रकरणी तुरुंगात - प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जीने स्वतःची मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्याच्या आरोपात 2017 मध्ये पोलिसांनी तिला अटक केली होती. इंद्राणी मुखर्जी गेल्या अनेक वर्षांपासून भायखळा जेलमध्ये आहे. इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये असताना देखील आपल्या विविध वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. तसेच हत्याकांडा संदर्भात विविध नवीन नवीन आरोप-प्रत्यारोप देखील पाहायला मिळाले आहे.

जामिनासाठी अर्जावर अर्ज - इंद्राणी मुखर्जीला 2015 मध्ये मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. इंद्राणी मुखर्जीची मुलगी शीना बोराच्या हत्याकांड मध्ये मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. 2015 पासून तब्बल 6 वर्ष पेक्षा अधिक काळापासून इंद्राणी मुखर्जी मुंबईतील महिला कारागृह भायखला येथे न्यायालयीन कोठडीत आहे. यापूर्वी इंद्राणी मुखर्जीने जामीन मिळवण्याकरिता 2017 पासून सहा अर्ज केले होते. मात्र तिला न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता.

माफीचा साक्षीदार ड्रायव्हर श्यामवर राय - या प्रकरणात माफीचा साक्षीदार झालेला माझा ड्रायव्हर श्यामवर राय याने शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात पिस्तुल बाळगले नव्हते, असे म्हटले तर शीना बोरा हत्याकांड खटल्यात त्याने पिस्तुल बाळगल्याचा कथित जबाब दिला आहे. त्यामुळे ही विसंगती आहे. शिवाय पोलिसांनी सन 2012 मध्ये हस्तगत केलेला सांगाड्याचा पुरावा ठोस नाही, असे मुद्दे मांडत इंद्राणीच्या वकिलांनी जामीन देण्याची विनंती केली. तसेच भायखळा तुरुंगात असलेली इंद्राणी अनेक आजारांनी ग्रस्त असल्याचे कारणही दिले. मात्र श्यामवर रायचा कबुलीजबाब आणि सरकारी पक्षांच्या साक्षीदारांच्या साक्षींची तपासणी व त्यांची विश्वासार्हता ही खटल्याच्या सुनावणीतच तपासली जाऊ शकते. या खटल्यात न्यायालयाने आरोपींविरोधात आरोप निश्चित केले असून, सुनावणी सुरू आहे. आरोपी इंद्राणीने यापूर्वी 6 वेळा केलेले अर्ज न्यायालयांनी फेटाळून लावले आहेत. इंद्राणी मुखर्जी गेली 6 वर्ष तुरूंगात आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुरू असलेल्या खटल्यात 253 पैकी केवळ 70 साक्षीदार आजवर तपासून झालेत. त्यामुळे हा खटला लवकर संपण्याची काहीही चिन्ह नाहीत. अश्या परिस्थितीत आणखीन किती काळ आरोपीला तुरूंगात ठेवणार? असा प्रमुख सवाल या याचिकेतून उपस्थित करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण - 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.