ETV Bharat / city

special megablock : शनिवार, रविवारी रात्री विशेष मेगाब्लॉक कुर्ला येथे गर्डर टाकण्याचे काम होणार - कुर्ला प्लॅटफॉर्म

कुर्ला प्लॅटफॉर्मवर (Kurla Platform) पादचारी पुलाच्या गर्डरसाठी (Kurla will be used to lay girders) शनिवार आणि रविवारी मध्यरात्री रात्रीचा विशेष मेघाब्लॉक (On Saturday and Sunday nights special megablock) असणार आहे. त्यामुळे प्रवाश्यानी अडचण होऊ नये यासाठी त्या पद्धतीने नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

megablock
मेगाब्लॉक
author img

By

Published : Oct 7, 2022, 7:53 PM IST

मुंबई: मध्य रेल्वे कुर्ला प्लॅटफॉर्म (Kurla Platform) क्रमांक 4 आणि 5 वर 8.0 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजचे पाच प्लेट गर्डर टाकण्यासाठी (Kurla will be used to lay girders) क्रेन वापरून अप धीम्या मार्गावर आणि डाउन जलद मार्गावर रात्रीचा विशेष पॉवर ब्लॉक ठेवण्यात आला आहे. ८ व ९ ऑक्टोबर रोजी शनिवार,रविवार रात्रीची व 12 वाजे नंतर ते सकाळी 06.00 पर्यंत अप अर्थात मुंबई सीएसएमटी दिशेने धीम्या मार्गावर विद्याविहार ते माटुंगा दरम्यान आणि डाउन जलद मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान हा ब्लॉक असणार आहे.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 05.20 वाजता सुटणारी के-1 कल्याण जलद एसी लोकल शॉर्ट ओरीजीनेट होऊन घाटकोपर येथून पहाटे 05.44 वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 12.24 वाजता सुटणारी एस-5 कर्जत लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. घाटकोपर येथून सकाळी 12.10 ते 06.00 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत.

अप उपनगरीय सेवा विद्याविहार स्टेशनवर ब्लॉक कालावधीत उपलब्ध नसतील.अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना दिली. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने नेहमी प्रमाणे दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच प्रवाश्यानी अडचण होऊ नये यासाठी त्या पद्धतीने नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.