मुंबई - मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर ( CM visit Aurangabad occasion of Mukti Sangram Din ) आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले जाणार ( CM Eknath Shinde visit Marathwada for two days ) आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री, भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे आदी यावेळी हजेरी लावणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर दुसऱ्या दिवशी मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने ध्वजारोहण करुन मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होणार आहेत.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण येत्या 17 सप्टेंबर अर्थात 75 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरु आहे. या दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. सकाळी 7 वाजता सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या स्मृती स्तंभाजवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होणार आहेत. तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने औरंगाबादेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमावरून नवीन वाद समोर येण्याची शक्यता दरवर्षी सकाळी नऊ वाजता मराठवाडा मुक्ती संग्रामचा कार्यक्रम पार पडतो. यंदा मात्र हा कार्यक्रम सकाळी 7 वाजता आयोजित केला आहे. प्रशासनाकडून तयारी सुद्धा केली जात आहे. मात्र, विरोधी पक्षांना कार्यक्रमाला डावलले आहे. शिवसेनेकडून याला तीव्र विरोध होतो आहे. त्यामुळे आता, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमावरून नवीन वाद समोर येण्याची शक्यता आहे.
शिवरायांचा 11 फूट उंच अश्वारुढ पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारुढ पुतळा 11 फूट उंच आहे. पंचधातु मध्ये बनवण्यात आलेल्या या पुतळ्याचे वजन सव्वा टन आहे. हा पुतळा तयार करण्यासाछी 35 लाख रुपये निधी लागला. विद्यापिठाच्या प्रांगणात एका उंच चौथऱ्यावर हा पुतळा ठेवला आहे. 7 सप्टेंबर रोजी हा पुतळा खुलताबाद येथून विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी खुलताबाद येथे पुतळ्याचे पुजन करून औरंगाबाद विद्यापीठात आणला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा असा असेल दौरा...
- शुक्रवार 16 सप्टेंबर, 2022 रोजी दुपारी. 2.30 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि तेथून मोटारीने शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण.
- दुपारी 2.45 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव
- दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण.
- दुपारी 4.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आगमन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण आणि राखीव.
- सायं. 05.30 वाजता विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री. विजय पाटील, यांचे कार्यालयास भेट आणि राखीव, (स्थळ:- सिध्दार्थ गार्डन शेजारी, औरंगाबाद.)
- सायं 05.45 वाजता सिध्दार्थ गार्डन येथून मोटारीने तापडिया नाट्य मंदिराकडे प्रयाण.
- सायं 6.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समिती आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद.)
- सायं. 06.30 वाजता तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.
- रात्री 07.15 वाजता शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव आणि मुक्काम.
- शनिवार, दि.17 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 06.30 वाजता शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथून मोटारीने सिध्दार्थ उद्यानाकडे प्रयाण.
- सकाळी 07.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम. (स्थळ : सिध्दार्थ उद्यान, औरंगाबाद.)
- सकाळी 07.15 वाजता सिध्दार्थ उद्यान औरंगाबाद येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण
- सकाळी 07.35 वाजता औरंगाबाद विमानतळ येथे आगमन आणि शासकीय विमानाने हैदराबाद विमानतळाकडे प्रयाण.