मुंबई - मुंबईमधील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात येत असतानाच युरोप आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे (Covid New Variant) रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईमध्ये परदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मुंबईत नव्या व्हेरियंटचा प्रसार होऊ नये. यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी (Genome Sequencing Test) केली जाणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच नव्या व्हेरियंटचा (Covid New Variant) सामना करण्यासाठी सज्ज होऊ या, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
प्रत्येक प्रवाशाची जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट (Genome Sequencing Test) -
युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांत कोरोनाचा फैलाव वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणूचा व्हेरियंट आढळून आला आहे. हा व्हेरियंट मुंबईमध्ये येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या माध्यमातून पसरू शकतो यामुळे महापालिका अलर्टवर आहे. नवा व्हेरियंटमुळे (Covid New Variant) चिंता वाढली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या पर्यटकांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा विचार आहे. दक्षिण आफ्रिकेतील नवीन व्हेरियंटमुळे विमान सेवा नक्कीच बंद होणार नाही. मात्र परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट (Genome Sequencing Test) केली जाणार आहे. पालिकेने जिनोम सिक्वेन्सिंगवर भर दिला असून या चाचणीला सर पर्यटकांना समोरे जावे लागणार आहे असे महापौर म्हणाल्या.
हे ही वाचा - Fake Corona Report : दुबईला जाणाऱ्या 40 प्रवाशांचा कोरोना अहवाल बनावट; मुंबई विमानतळावर रोखले
व्हेरियंटचा सामना करण्यासाठी सज्ज होऊया -
युरोप मध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. येणाऱ्या प्रवेशामध्ये नवा व्हेरियंट आढळू शकतो. यामुळे पर्यटकांच्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या (Genome Sequencing Test) करण्यावर भर दिला आहे. तसेच या देशांमधील पर्यटकांचे जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी कोरोना टास्क फोर्सकडे केली आहे. रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जीयम, जर्मनी या देशांत कोरोनाचा फैलाव वाढला आहे. हा अफैलाव पर्यटकांच्या माध्यमातून मुंबईमध्ये होऊ नये यासाठी सर्व मुंबईकर नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत. मास्क लावणे, हात सतत धुणे, सोशल डिस्टंसिंग या नियमांचे पालन करून नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी सज्ज होऊया असे आवाहन महापौरांनी केले आहे.
आज बैठक -
दरम्यान नव्या व्हेरियंटबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत नव्या व्हेरियंटला रोखण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत सर्व कोव्हिड हॉस्पिटलचे डिन, टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.