मुंबई - मुंबई उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी ।
कुबेरांची वस्ती तिथं सुख भोगती ॥
पराळात राहणारे । रातदिवस राबणारे
मिळेल ते खाऊनी घाम गाळती
या अण्णाभाऊ साठेंच्या कवितेच्या ओळी, मुंबईतील पूर्वीचे गिरणगावातील म्हणजेच आताचे लालबाग परळ येथील या ओळींची सत्यता मांडणाऱ्या आहेत. पूर्वीचे गिरणगाव आता अनुभवायला मिळत नाही. मात्र, मुंबईत राहणाऱ्या पराग सावंत आणि त्याच्या मित्रांनी गणेशोत्सवानिमित्त गिरणगावचा देखावा तयार केला आहे.
देखाव्यातून मुंबईचे दर्शन
लालबाग परळ हा गिरणगाव मराठी माणसांच हक्काचं ठिकाण. याच परिसरात मोठ्या मूर्ती सार्वजनिक मंडपामध्ये केलेली आरास हे प्रत्येकाचं मन मोहून घेते. मात्र, कोरोनाचा काळ आला आणि प्रत्येक उत्सवावर निर्बंध लागताना आपल्याला दिसून येतात. हे जरी असले तरीही लालबाग परिसरात राहणारा पराग सावंत यांना एक उत्कृष्ट देखावा आपल्या घरी तयार केला आहे. मागच्या वर्षी त्याने देखाव्यात चाळ संस्कृती दाखवली होती. या वर्षी त्यांना आपल्या देखाव्यांमध्ये संपूर्ण गिरणगाव दाखवला आहे.