मुंबई - 14 महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभागाचे आरक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मात्र ओबीसी आरक्षण लागू झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका नको, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घेतली असली तरी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षानी जय्यत तयारी सुरू केली आहेत. आरक्षण सोडत ( OBC reservation Issue ) जाहीर झाली तरी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशाला दिलेल्या निकालाच्या धरतीवर राज्यात ओबीसी आरक्षण लागू करू, असा विश्वास महाविकास आघाडी सरकारकडून ( Mahavikas Aghadi government ) व्यक्त केला जात आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत बाकी या समितीकडून इम्पेरिकल डेटा गोळा ( Imperial data collection ) करून सर्वोच्च न्यायालयात त्याच्या आधारे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण लागू करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे.
होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण मिळेल का? हा प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहे. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील राज्यात आरक्षण आणावे अशी आशा ओबीसी समाजाची आहे. प्रभाग निहाय आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी निवडणुकांपूर्वी ओबीसी आरक्षण मिळेल असा विश्वास महाविकास आघाडी सरकारने व्यक्त केला आहे. तसेच विरोधीपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने देखील आरक्षण मिळो किंवा नाही मात्र एकूण जागेपैकी ओबीसी समाजाचे आरक्षण देण्याचे निर्णय भाजपाने केला आहे. असे असले तरी निवडणुकीपूर्वी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण नियमित होईल, याची शाश्वती सध्या तरी नाही. यासोबतच होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाने स्थानिक पातळीवर आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठीचा कार्यक्रम प्रत्येक पक्षाने स्थानिक पातळीवर राबवत असून निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयार असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय पक्षांकडून मनपा निवडणुकांची तयारी : 14 महानगरपालिकासाठी प्रभाग निहाय आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. तसेच गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रलंबित आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिल्यानंतर राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ओबीसी आरक्षणासाठी प्रत्येक पक्ष आग्रही असला तरी न्यायालयाच्या निर्णयाबाबतची वाट न पाहता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणुकांची तयारी राजकीय पक्षाने सुरु केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षण लागू होईल, किंवा नाही मात्र राजकीय पक्षाने स्थानिक पातळीवर निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यामध्ये निवडणुका नकोत असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशाप्रकारे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत आग्रही आहेत हे सांगण्याचा प्रयत्न खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी केले. मात्र असे असले तरी निवडणुकांसाठी ची राज्यभर तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून नुकताच राज्य भराचा परिसंवाद यात्रा पूर्ण करण्यात आली. या परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र आणत येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात चा आढावा या यात्रेतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद सातत्याने वाढवण्यासाठी पक्षाकडून अनेक कार्यक्रम राज्यभर राबवले जात आहे. त्याचाच भाग म्हणून खुद्द जयंत पाटील परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांकडून महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणूक याबाबतचा आढावा घेत होते. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दर गुरुवारी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार इतर पक्षातील शेकडो स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत आहेत.
काँग्रेस पक्षाकडून स्थानिक निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाने देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर आपल्या कार्यक्रमांची आखणी केली आहे. गेल्या काही महिन्यापासून काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण राज्यभर कार्यकर्ता जोडणी अभियान सुरू करण्यात आला आहे. डिजिटल माध्यमातून राज्यभरातून काँग्रेस कार्यकर्ते जोडण्याचे काम राज्यातील प्रत्येक काँग्रेस नेत्या दिल्लीच्या हाय कमानकडून सोपवण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून एकूण नवीन किती कार्यकर्ते काँग्रेस पक्षाची जोडले गेले या बाबतचा आढावा दिल्लीतून घेतला जातोय. तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडूनही राज्यभराच्या दौऱ्यांनी सुरू असून स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांना बळ देण्याचे काम काँग्रेसकडून सुरु झाले आहे.
शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियानाची सुरुवात : स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून शिवसेनेने देखील राज्यभर शिवसंपर्क अभियानाची सुरुवात केली आहे. याबाबत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष घालत असून याबाबतच्या विभागवार बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत. तसेच शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील शिव संपर्क अभियानाच्या अंतर्गत राज्यात काही ठिकाणी दौरे करत आहेत. शिव संपर्क अभयारण्याच्या माध्यमातुन महाविकास आघाडी सरकारने केलेली काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये याचा फायदा थेट शिवसेनेला होईल. तसेच खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता राज्यभर दौरा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार जून महिन्यात मराठवाडा आणि त्यानंतर विदर्भ असेल लक्ष शिवसेनेचा असणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुद्द मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात सभा घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
भाजपा राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक : राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सामान्य नागरिकांवर झालेला अन्याय पोटतिडकीने जनतेसमोर ठेवा असा आदेश भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. राज्यामध्ये असलेल्या विविध समस्या घेऊन राज्यभरात भारतीय जनता पक्षाकडून मोर्चे आणि आंदोलन केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांची वीज बिल, कर्जमाफी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एफ आर पी आणि आरक्षण मुद्द्यावर भाजपा आक्रमक झाले असून राज्यभरात राज्य सरकारचा विरोध आंदोलन करत आहे. तसेच मुंबई शिवसेनेच्या विरोधात पोलखोल यात्रा भारतीय जनता पक्षाकडून काढण्यात आली. महानगरपालिकेमध्ये शिवसेनेकडून झालेला भ्रष्टाचार या पोल-खोल यात्रेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. तसेच महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती तयार करण्यासाठी नुकतीच कार्यकारणीची बैठक पार पडली आहे. यातून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक वरिष्ठ नेत्यांना होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा - PM Narendra Modi Rangoli : अमरावतीत साकारली पंतप्रधान मोदींची 11 हजार स्क्वेअर फूट रांगोळी