ETV Bharat / city

MUMBAI CORONA: मुंबईत कोरोना आटोक्यात, मात्र तरीही 1532 मजले सील

मुंबईत कोरोनाचे दिवसाला सुमारे ३०० रुग्ण रोज आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मात्र आजही इमारतीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने मुंबईमधील तब्बल १५२३ मजले सील आहेत.

विशेष बातमी
विशेष बातमी
author img

By

Published : Aug 6, 2021, 5:10 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचे दिवसाला सुमारे ३०० रुग्ण रोज आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मात्र आजही इमारतीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने मुंबईमधील तब्बल १५२३ मजले सील आहेत. या सील मजल्यांवर २ लाखाहून अधिक मुंबईकर राहत आहेत. बोरिवली, अंधेरी, कांदिवली, मालाड या विभागात सर्वाधिक मजले सील असल्याची तर कुर्ला आणि खार या विभागात एकही मजला सील नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

१ हजार ५३२ मजले सील -
मुंबईत ज्या इमारतीमध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेले ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळून येतात अशा इमारती सील केल्या जातात. त्याचप्रमाणे ज्या इमारतीत एकाच मजल्यावर दोन पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतात असे मजले सील केले जातात. ४ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार मुंबईत १ हजार ५३२ मजले सील आहेत. त्यामध्ये ६७ हजार घरे असून त्यात २ लाख १४ हजार नागरिक वास्तव्य करत आहेत. बोरिवली येथील आर सेंट्रल विभागात २३८ मजले सील आहेत. तर अंधेरी पश्चिम के वेस्ट विभागात १६४, कांदिवली आर साऊथ विभागात १५०, मालाड येथील पी नॉर्थ विभागात १२८, मुलुंडच्या टी विभागात १२२, अंधेरी पूर्व येथील के वेस्ट विभागात १०२ मजले सील आहेत. इतर विभागात शंभरहून कमी मजले सील आहेत. तर कुर्ला येथील एल तसेच खार एच ईस्ट विभागात एकही मजला सील नाही. एकाच इमारतीमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास ती इमारत सील केली जाते. मुंबईत अशा ४१ इमारती सील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

काय आहेत सील इमारती, कंटेनमेंट झोन?
मुंबईत ज्या इमारतीमध्ये ५ पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळळून येतात त्या इमारती सील केल्या जातात. ज्या इमारतीमध्ये एकाच मजल्यावर २ पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतात ते मजले सील केले जातात. तर ज्या झोपडपट्ट्या आणि चाळीत कोरोना रुग्ण आढळून येतो त्याठिकाणी दाटीवाटीने लोक राहत असल्याने त्या झोपडपट्ट्या चाळी सील केल्या जातात. तेथील नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरण्यास बंदी घातली जाते.

कंटेनमेंट झोनची कडक अमलबजावणी -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्ण आढळून आल्यास त्या ठिकाणी कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत त्यांच्याशी पालिकेचे आरोग्य अधिकारी कर्मचारी त्यांची माहिती घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आहेत. रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हेही वाचा - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.