ETV Bharat / city

राज्यात आता मराठी भाषा विद्यापीठ, उदय सामंत यांची माहिती - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

वर्धा येथे हिंदी भाषेचे विद्यापीठ, आंध्रात तेलुगू विद्यापीठ तर अन्य प्रांतात संबंधित भाषेची विद्यापीठे आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील मराठी भाषा विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, अशा शिफारस करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली.

Uday Samant,
Uday Samant,
author img

By

Published : Mar 10, 2021, 9:57 PM IST

मुंबई - वर्धा येथे हिंदी भाषेचे विद्यापीठ, आंध्रात तेलुगू विद्यापीठ तर अन्य प्रांतात संबंधित भाषेची विद्यापीठे आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील मराठी भाषा विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, अशा शिफारस करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली.

शिफारस आणि ठरावाचा आढावा घेणार -

मराठी भाषेचे विद्यापीठ राज्यात स्थापन करण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने भाषा सल्लागार समितीच्या पुणे येथे १ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या बैठकीत भाषा सल्लागार समितीने ठराव पारित केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषेचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या भाषा सल्लागार समितीच्या शिफारशी व ठरावाचा आढावा घेऊन भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा, भाषा विद्यापीठाचे संकुल, प्रशासकीय यंत्रणा, शैक्षणिक विभाग, भाषा प्रयोगशाळा, विद्यापीठाची केंद्रे, कर्मचारी वर्ग, न्यायालयीन कामकाजासाठी मराठी भाषेचा वापर, प्रशासन व नवतंत्रज्ञानात मराठीचा वापर इत्यादी बाबींवर शिफारस करण्यासाठी राज्य शासन लवकरात लवकर समिती गठित करेल.

महाराष्ट्र राज्यात मराठीला शोभेल असे देशातील उत्कृष्ट मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्र शासन स्थापन करेल. यासाठीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात येईल, असे सामंत यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.