ETV Bharat / city

संचारबंदीचे नियम होणार अधिक कडक, किराणा दुकाने केवळ चार तास सुरू ठेवण्यास मुभा - राजेश टोपे यांची पत्रकार परिषद मुंबई

राज्यात संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्याचे संकेत दिले गेले आहेत. किराणा दुकाने ठरावीक वेळेतच खुली करता येणार आहेत. सकाळी 7 ते 11 या वेळेतच किराणा दुकाने सुरू राहतील. तसेच राज्यात ऑक्सीजनचा साठा कमी आहे. येणाऱ्या काळात अठराशे टन ऑक्सीजन राज्याला मिळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

संचारबंदीचे नियम होणार अधिक कडक
संचारबंदीचे नियम होणार अधिक कडक
author img

By

Published : Apr 19, 2021, 8:19 PM IST

मुंबई - राज्यात संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्याचे संकेत दिले गेले आहेत. किराणा दुकाने ठरावीक वेळेतच खुली करता येणार आहेत. सकाळी 7 ते 11 या वेळेतच किराणा दुकाने सुरू राहतील. तसेच राज्यात ऑक्सीजनचा साठा कमी आहे. येणाऱ्या काळात अठराशे टन ऑक्सीजन राज्याला मिळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सध्या कडक निर्बंध लावले गेलेले आहेत. हे कडक निर्बंध 30 एप्रिलपर्यंत लागू असतील. मात्र ज्या उद्देशासाठी कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते उद्दिष्ट पूर्ण होताना दिसत नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लावण्यात आलेल्या निर्बंधांना नागरिक गांभीर्याने घेत नसून, शुल्लक कारणासाठी देखील नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. म्हणूनच आता किराणा मालाचे दुकान केवळ चार तासच सुरू ठेवता येणार असल्याच निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी 7 ते 11 पर्यंत ही वेळ असणार आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच नागरिकांनी सहकार्य केले नाही तर, संचारबंदीचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. म्हणून येणाऱ्या दिवसात परिस्थिती अशीच राहिली तर राज्य सरकार कडून हे निर्बंध अजून कडक करण्यात येतील असा इशाराही यावेळी राजेश टोपे यांनी दिला आहे.

संचारबंदीचे नियम होणार अधिक कडक

राज्याला दर दिवशी मिळणार अठराशे मेट्रिक टन ऑक्सिजन

सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. यासोबतच रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आता पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार येणाऱ्या काही दिवसात राज्यात दर दिवसाला 1800 मेट्रिक टन ऑक्‍सिजन उपलब्ध होईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंबंधीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी यांच्यात झाली. राज्यात रो रो पद्धतीने ऑक्सिजन आणला जाणार आहे. तसेच हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे काही प्लांट्स राज्यामध्ये तत्परतेने उभे करणार असल्याची माहिती बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. हे प्लांट उभे करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी तात्काळ निर्णय घेतील. यासाठी टेंडर काढण्याची गरज नसल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच राज्यातील थर्मल पावर स्टेशनमधील ऑक्सिजन वापरता येईल का याची देखील चाचपणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी परळीमध्ये असलेल्या पावर प्लांटमध्ये प्रयत्न सुरु केले असल्याचं यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले.

रेमडेसिवीर तयार करणाऱ्या 20 प्लांटला परवानगी

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. मात्र येणाऱ्या काळात हा तुटवडा भासू नये म्हणून केंद्र सरकारने देशभरामध्ये 20 रेमडेसीविर इंजेक्शन तयार करणाऱ्या प्लांटला परवानगी दिली आहे. देशातील सात कंपन्या या इंजेक्शनचे उत्पादन करणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात इजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकारण पेटले; अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांचे भाजपाला उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.