ETV Bharat / city

IIT Mumbai : आता आयआयटी मुंबईमध्ये नवीन अभ्यासक्रम.. मास्टर ऑफ आर्ट्स बायो रिसर्च - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई

आयआयटी मुंबईमध्ये आता नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणार ( IIT Mumbai New Course ) आहे. मास्टर ऑफ आर्ट्स बायो रिसर्च (एम.ए. रिसर्च ) ( Master of Arts Bio Research (M.A. Research) ) असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे. यामध्ये संशोधन कौशल्यावर भर देण्यात येणार आहे.

आयआयटी मुंबई
आयआयटी मुंबई
author img

By

Published : Apr 13, 2022, 10:42 PM IST

मुंबई- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईच्या ( Indian Institute of Technology Mumbai ) वतीने एक नवीन आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार ( IIT Mumbai New Course ) आहे. मास्टर ऑफ आर्ट्स बायो रिसर्च (एम.ए. रिसर्च ) ( Master of Arts Bio Research (M.A. Research) ) या अभ्यासक्रमांमध्ये केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर कामाच्या ठिकाणी महत्वाचा असलेल्या संशोधन कौशल्यावर भर देण्यात येणार आहे.

गांभीर्याने लिहायला शिकतील- मास्टर ऑफ आर्ट्स बायो रिसर्च (एम.ए. रिसर्च ) या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी माहितीचे विविध स्रोत एकत्रित करायला शकतील वाचून विचार करायला आणि गांभीर्याने लिहायला शिकतील. तसेच वैचारिक विश्लेषणात्मक आणि पद्धतशीर चौकटीत आपले लेखन कार्य सादर करू शकतील. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातल्या सामान्य अभ्यासक्रमानंतर, विस्तृत, व्यापक अभ्यासक्रमाची निवड करणे शक्य होणार आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आपला दृष्टिकोन अधिक सक्षम करण्यासाठी आणि येणाऱ्या प्रश्नांना शिस्तबद्ध पद्धतीने उत्तर देण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयोगी पडणार आहे.

नव्या अभ्यासक्रमासाठी फक्त 20 जागा- दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमासाठी 20 जागांना मान्यता देण्यात आली आहे. जुलै 2022 मध्ये सुरू होत असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये तीन विस्तृत विशेष विषयांमध्ये शिकवण्यात येणार आहे. यामध्ये अ -मानव विज्ञान, ब- भाषाशास्त्र, साहीत्य आणि कामगिरी तसेच क- समाजशास्त्र. या अभ्यासक्रमासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या गेट म्हणजे जीएटीई- एक्सएच परीक्षेतल्या गुणानुसार तसेच प्रवेश परीक्षा (एमएटी) आणि मुलाखत यांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.

आयआयटी मुंबई संचालक काय म्हणाले- या नवीन अभ्यासक्रमाविषयी बोलताना आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिश चौधुरी म्हणाले की, आयआयटी मुंबई सर्व शैक्षणिक कार्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये उत्तम विश्लेषणात्मक कौशल्य विकसित व्हावे यावर भर देते. नव्याने प्रस्तावित झालेल्या एम.ए. रिसच अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या मध्ये 'लर्निंग बॉय डुइंग' ही संकल्पना बळकट होईल. एचएसएस विभागाचे प्रमुख प्राध्यापक कुशल देव म्हणाले की विभागाला विशेषत: आंतरविद्याशाखीय अध्यापन शांतता आणि संशोधनामध्ये विद्यार्थ्यांचा नवीन गट प्रशिक्षित करण्याची संधी मिळेल म्हणून या नवीन अभ्यासक्रमासाठी उत्सुक आहोत.

हेही वाचा : मुंबईला हवामान बदलाचा धोका, आयआयटी तज्ज्ञांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.