ETV Bharat / city

'बेस्ट'च एका सिट्सवर लवकरच दोन प्रवासी, प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजूरीसाठी

author img

By

Published : Sep 24, 2020, 12:21 PM IST

कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात मुंबईतील प्रवासी वाहतुकीसाठी बेस्टच्या बसेस रस्त्यावर धावत होत्या. आता बेस्टच्या बसेसमधून र्नाटक व गुजरातच्या धर्तीवर एका सीटवर दोन प्रवाशांना बसण्याची परवानगी देण्याची मागणी बेस्ट उपक्रमाने राज्य सरकारकडे केली आहे.

mumbai transport bus
'बेस्ट'च एका सिट्सवर लवकरच दोन प्रवासी

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सहा महिने रेल्वे सेवा बंद असताना मुंबईत वाहतुकीसाठी बेस्टच्या वापर केला जात आहे. बेस्टच्या बसमधून एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्याची, तर पाच प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्याची परवानगी आहे. याकारणाने प्रवाशांना तासनतास बेस्टची वाट बघत प्रवास करावा लागत आहे. मात्र आता कर्नाटक व गुजरातच्या धर्तीवर एका सीटवर दोन प्रवाशांना बसण्याची परवानगी देण्याची मागणी बेस्ट उपक्रमाने राज्य सरकारकडे केली आहे. यामुळे बेस्टच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईत मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. रुग्णांची संख्या देशभरात वाढत असल्याने २२ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊनमुळे मुंबईची लाईफलाईन असलेली ट्रेन सेवा बंद पडली. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार आदी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी बेस्टच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. लॉकडाऊनच्या काळात बेस्टने २ लाख ५० अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत होते.

मिशन बिगीन अंतर्गत शहरातील सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागल्यावर ८ जूनला बेस्टमधून सर्वसामान्य प्रवाशांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली. त्यावेळी बेस्टमधून ४ लाख १९ हजार प्रवासी प्रवास करत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलथा दिली जात आहे तशी प्रवाशांची संख्या वाढत आहे. ३१ ऑगस्टला १५ लाख ३२ हजार ३६४, २ सप्टेंबरला १५ लाख ७३ हजार ८३० तर १४ सप्टेंबरला १६ लाख ९८ हजार ८४२ प्रवासी बेस्टने प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. बेस्टकडे ३५०० बसेस असून त्यापैकी ३ हजार बसेस चालवल्या जात आहेत.

बस कमी आणि प्रवासी संख्या जास्त असल्याने प्रवाशांना बसची वाट बघून बस आल्यावर प्रवास करून नियोजित ठिकाणी जाण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत आहे. सकाळी कामावर आणि सायंकाळी कामावरून घरी जाण्यासाठी गर्दी होत असताना एका सीटवर एक प्रवासी व पाच उभे प्रवासी हा नियम धाब्यावर बसवला जात आहे. बेस्टमधून सोशल डिस्टनसिंगचाही नियम धाब्यावर बसवला जात आहे. यासाठी बसमध्ये एका सीटवर दोन प्रवासी बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बेस्ट उपक्रमाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

बेस्टची संख्या
एकूण बस - ३५००
चालवल्या जातात - ३०००

प्रवासी संख्या
२२ मार्च ते मे - २,५०,०००
८ जून - ४,१९,०००
३१ ऑगस्ट - १५,३२,३६४
२ सप्टेंबर - १५,७३,८३०
१४ सप्टेंबर - १६,९८,८४२

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.