ETV Bharat / city

Fadnavis On North Indians : चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय हे देखील मुंबईकरच - देवेंद्र फडणवीस - उत्तर भारतीय संघ मुंबई

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांबाबत मोठे विधान केले ( Devendra Fadnavis On North Indians ) आहे. चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय हे देखील मुंबईकरच असल्याचं त्यांनी म्हटलं ( North Indians Are Also Mumbaikar ) आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या ( BMC Elections 2022 ) पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्वाचे मानले जात आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 15, 2022, 9:17 PM IST

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या ( BMC Elections 2022 ) तोंडावर उत्तर भारतीय मुद्द्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले ( Devendra Fadnavis On North Indians ) आहे. ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर असल्याचे वक्तव्य त्यांनी ( North Indians Are Also Mumbaikar ) केले. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगीकारली आहे. उत्तर भारतीय संघाने ( Uttar Bharatiya Sangh Mumbai ) कर्करोगग्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांसाठी तसेच यात्रेकरूंसाठी उभारलेल्या विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीसांनी हे विधान केले. वांद्रे पूर्व येथे हे नव्याने बांधण्यात आलेल्या बाबू आर एन सिंह गेस्ट हाऊसचे ( Babu R N Singh Guest House Mumbai ) उद्घाटन त्यांनी केले.

रूग्णसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा : मुंबईत टाटा कॅन्सर रूग्णालय येथे उपचारासाठी देशभरातून येणाऱ्या कर्करोग रूग्णांच्या नातेवाईकांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांसाठी घेण्यात आलेल्या या पुढाकारामुळे अनेकांना याचा फायदा होईल तसेच दिलासाही मिळेल. आपल्या वडिलांना कर्करोगाच्या उपचारासाठी नेतानाचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, म्हणाले की मी अनेक रूग्णांच्या नातेवाईकांना तसेच रूग्णांनाही रस्त्यावर राहताना पाहिले आहे. रूग्णांच्या नातेवाईकांची गरज आणि मागणी लक्षात घेता या बाबु आरएन सिंह गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची तसेच अन्नाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यल्प दरात अशी ही व्यवस्था गेस्ट हाऊसच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. रूग्णसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे, असेही फडणवीस याप्रसंगी म्हणाले. उत्तर भारतीय नागरिकांनीही महाराष्ट्राची संस्कृती अंगीकारली, आता तेदेखील मुंबईकरच आहेत असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाच्या सुविधा : उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आरएन सिंह यांनी सांगितले की, 'बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह' 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातून विषेश म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कर्करोगग्रस्त रुग्ण उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात येतात. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही रुग्णालयाबाहेर रस्त्यावर राहावे लागत आहे. अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय अल्प दरात बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय देवदर्शनाला येणाऱ्या नागरिकांना सुद्धा अतिथीगृह उपलब्ध करून देण्यात येईल. या अतिथीगृहात परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे जेवणही मिळणार आहेत.

हेही वाचा : उत्तर भारतीयांना आरक्षण देण्यास राज्य सरकार सकारात्मक -वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.