ETV Bharat / city

ED probe of Anil Deshmukh Son: ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा नाही; 9 डिसेंबरला पुढील सुनावणी - ED notice to Hrishikesh Deshmukh

100 कोटी कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ( ED notice to Hrishikesh Deshmukh ) ऋषिकेश देशमुख यांना नोटीस बजावली होती. मात्र ऋषिकेश देशमुख हे ईडी कार्यालयात न हजर राहिले नव्हते. त्यांनी विशेष न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सोमवार (6 डिसेंबर) सुनावणी झाली. ऋषिकेश देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी ( Senior advocate Vikram Chaudhary in special court ) यांनी बाजू मांडली.

ईडी कार्यालय
ईडी कार्यालय
author img

By

Published : Dec 6, 2021, 8:23 PM IST

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनी दाखल केलल्या ( ED probe of Anil Deshmukh Son ) अटकपूर्व जामिनावर विशेष न्यायालयात सुनावणी झाली. त्यांना न्यायालयाने ( No relief for Hrishikesh Deshmukh from special court ) दिलासा नाही. पुढील सुनावणी 9 डिसेंबरला ( Next hearing on 9th December ) होणार आहे.

100 कोटी कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ( ED notice to Hrishikesh Deshmukh ) ऋषिकेश देशमुख यांना नोटीस बजावली होती. मात्र ऋषिकेश देशमुख हे ईडी कार्यालयात न हजर राहिले नव्हते. त्यांनी विशेष न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सोमवार (6 डिसेंबर) सुनावणी झाली. ऋषिकेश देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी ( Senior advocate Vikram Chaudhary in special court ) यांनी बाजू मांडली. ईडीला कुठल्या सीमा आहे की नाही? असा त्यांनी प्रश्न सुनावणीदरम्यान उपस्थित केला. अनिल देशमुख प्रकरणांमध्ये ईडीकडून कायद्याचे पालन होत नसल्याचेदेखील ज्येष्ठ वकील चौधरी यांनी म्हटले आहे. ऋषिकेश देशमुख यांच्या वकिलांना वेळ कमी पडल्यामुळे पुढील सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे. त्याच दिवशी ईडीलादेखील युक्तिवाद करणार आहे.

हेही वाचा-Parambir Singh : कायद्याला छेद देणारी वागणूक एका पोलीस अधिकाऱ्याकडून अनपेक्षित - ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत

काय आहे ईडीचा दावा?

मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा (Anil Deshmukh) मुलगा ऋषीकेश देशमुखचा सक्रिय सहभागी असल्याचा ईडीचा दावा आहे. वडिलांनी (गृहमंत्री अनिल देशमुख ) यांना मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात ऋषिकेश यांचा महत्त्वाचा सहभाग आहे, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED)वतीने विशेष न्यायालयात करण्यात आला होता. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून तब्बल अकरा कंपन्या चालविल्या जात असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये उघड झाले आहे. यापैकी बहुतांश कंपन्यांमध्ये ऋषिकेश संचालक किंवा भागधारक आहेत.

हेही वाचा-Cross-Examination of Sachin waze : सचिन वाझे यांची अनिल देशमुख यांच्या वकिलाकडून उलटतपासणी

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहेत.

हेही वाचा-Anil Deshmukh's Family Vs ED : मालमत्तेवरील जप्ती उठवा, अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

ईडीकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता
ईडीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए (PMLA) अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4 कोटी 20 लाखांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. देशमुख कुटुंबाची कंपनी मेसर्स प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड (Messrs. Premier Port Links Pvt Ltd) ही अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख (Aarti Deshmukh) यांच्या मालकिची आहे. आरती देशमुख यांच्या नावावर असलेला 1.54 कोटीचा वरळीच्या फ्लॅट आणि कंपनीच्या नावावर धुतूम गांव, उरण, रायगड येथे असलेली 2.67 कोटींची जमीन ईडीने जप्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.