ETV Bharat / city

अभिनेत्री कंगना मुंबईत पोहोचली, संजय राऊत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष - Sanjay Raut Reaction on Actress Kanganas

काल विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये कंगना रणौतवरून मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. कंगनाच्या मुंबई आणि महाराष्ट्रद्रोही विधानांवरून विधान परिषदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला आहे. कंगनाचीही ड्रग कनेक्शनवरून चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. तसेच, अनधिकृत बांधकामावरून पालिकेची कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई सुरू होती. मात्र, उच्च न्यायालयाने याला स्थिगिती दिली.

अभिनेत्री कंगना, संजय राऊत
अभिनेत्री कंगना, संजय राऊत
author img

By

Published : Sep 9, 2020, 4:59 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या मधील सामना गेली महिनाभर रंगला आहे. या गदारोळात वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना आज मुंबईत दाखल झाली. आज सामनाचे संपादक संजय राऊतही 'सामना'च्या मुंबई येथील लोअर परेल भागातील कार्यालयात दाखल झाले. ते काय वक्तव्य करतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, अद्याप त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही.

अभिनेत्री कंगना मुंबईत पोहोचली, संजय राऊत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष

काल विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये कंगना रणौतवरून मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. कंगनाच्या मुंबई आणि महाराष्ट्रद्रोही विधानांवरून विधान परिषदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला आहे. कंगनाचीही ड्रग कनेक्शनवरून चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. त्याशिवाय अभिनेत्री कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई महानगर पालिकेने नोटीस देखील जारी केली आहे. यानुसार, आज सकाळपासून येथे तोडक कारवाई सुरू होती. मात्र, उच्च न्यायालयाने याला स्थिगिती दिली.

अभिनेत्री रणौत आणि शिवसेनेचा हा सामना गेले महिनाभर सुरू असून उत्तर-प्रत्युत्तराने वाद दिवसेंदिवस चिघळला आहे. अभिनेत्री कंगना रानौत आज दुपारी चंदिगड मार्गे मुंबईत दाखल होणार आहे तिच्या सुरक्षितेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक काय प्रतिक्रिया देत आहेत आणि संजय राऊत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.