ETV Bharat / city

Eknath Shinde Cabinet Expansion : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, आज होणार मंत्रिमंडळाची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 18 जुलैनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा ( Shinde Government Ministry expansion ) निर्णय घेतील, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर ( Deepak Kesarkar on Ministry Expansion ) यांनी केला होता.

मंत्रिमंडळ बैठक
मंत्रिमंडळ बैठक
author img

By

Published : Jul 14, 2022, 11:08 AM IST

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर विश्वासदर्शक ठराव जिंकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला. मात्र, तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने धाव घेत एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापनेला आव्हान दिले आहे. आज दोन मंत्री असलेल्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 18 जुलैनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा ( Shinde Government Ministry expansion ) निर्णय घेतील, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर ( Deepak Kesarkar on Ministry Expansion ) यांनी केला होता. दिपक केसरकर यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, 13 जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता नाही. कारण आमचे काही आमदार आणि भाजपचे आमदार आगामी राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार 18 जुलैनंतर- पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघं मिळून ( Maharashtra cabinet ) घेतील. सध्या महाराष्ट्रात सर्व काही सुरळीत चालेले आहे. 13 जुलैपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता नाही. कारण आमचे काही आमदार आणि भाजपचे आमदार आगामी राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यानंतर ते मुंबई तेथे मुंबईत देखील भाजपचे व आमचे सर्व आमदार मिळून 16 तारखेला एक बैठक होईल. 17 तारखेला प्रत्यक्षात मतदान कसे केले जाते, याची माहिती दिली जाईल. 18 तारखेला मतदान होईल. त्यामुळे एवढ्या घाई गडबडीत मंत्रिमंडळ विस्तार ( President election 2022 ) शक्य नाही, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.