ETV Bharat / city

'पुन्हा लॉकडाऊन ही अफवा', मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंचे ट्वीट - uddhav thackeray on lockdown extension

वाढती कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात पुन्हा संचारबंदी लागू करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

cm uddhav thackeray news
'पुन्हा लॉकडाऊन ही अफवा', मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंचे ट्वीट
author img

By

Published : Jun 12, 2020, 2:36 PM IST

Updated : Jun 12, 2020, 4:10 PM IST

मुंबई - वाढती कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात पुन्हा संचारबंदी लागू करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी या अफवेचे खंडन केले असून ‘लॉकडाऊन पुन्हा जाहीर केले नाही', या आशयाचे ट्वीट केले आहे. मात्र, गर्दी न करता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नियमांचे पालन करण्यासोबतच 'स्वत:ची काळजी घ्या', असे ते म्हणाले.

  • लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या.

    — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यासह देशभरात लॉकडाऊन पुन्हा लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी या पार्श्वभूमीवर अतिरिक्त गरजेच्या वस्तूंचे संचयन करण्यास सुरुवात केली. सर्वत्र संभ्रमाचे वातावरण असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून केलेले ट्वीट सूचक आहे.

अनलॉक १.०

  • राज्यात 'या' गोष्टींना परवानगी
  • मुंबई महानगर भागात (एमएमआर) कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रवास करता येणार
  • राज्य शासन आणि मुंबई महापालिकेच्या आदेशानुसार सरकारी, खासगी कार्यालयातील कर्मचारी आणि स्वयंरोजगार असणाऱ्यांना ओळखपत्र दाखवून बेस्ट बसमधून प्रवास करता येणार आहे.
  • घराबाहेरील व्यायामासाठी परवानगी. मैदानावरील व्यायामासाठी सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सूट
  • समुद्र किनारे, खासगी/सार्वजनिक मैदाने, उद्याने यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सायकलिंग/ धावणे/ जॉगिंगला काही अटींवर परवानगी
  • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट-कंट्रोल, आणि इतर तंत्रज्ञ यांसारख्या व्यावसायिकांना सूट. त्यासाठी मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे बंधनकारक
  • मॉल आणि शॉपिंग कॉम्पलेक्स व्यतिरिक्त बाजारपेठेतील अन्य दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वेळेत सम-विषम नुसार उघडणार

    राज्यात 'या' गोष्टींवर बंदी कायम
  • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, विविध शिकवणीवर्ग
  • लोकल वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद
  • केशकर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर
  • स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी नसलेल्यांना रेल्वे आणि आंतरदेशीय विमानप्रवास
  • चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह आणि तत्सम इतर ठिकाणे
  • आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी. (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून)
  • आंतरराष्ट्रीय सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठे समारंभ

Last Updated : Jun 12, 2020, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.