ETV Bharat / city

लॉकडाऊनबाबत अद्याप निर्णय नाही, उद्या पुन्हा टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

author img

By

Published : Apr 11, 2021, 10:26 PM IST

राज्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात काय स्थिती आहे. याची चाचपणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत राज्याच्या आरोग्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यासोबतच राज्यात वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच आरोग्य व्यवस्था आहे का? याचादेखील आढावा या बैठकीत घेण्यात आलेला आहे.

No decision on lockdown
No decision on lockdown

मुंबई - राज्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात काय स्थिती आहे. याची चाचपणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत राज्याच्या आरोग्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यासोबतच राज्यात वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच आरोग्य व्यवस्था आहे का? याचादेखील आढावा या बैठकीत घेण्यात आलेला आहे. यावेळी टास्क फोर्सचे सदस्य राज्यात 14 दिवस लॉकडाऊन असावा यासाठी आग्रही होते. मात्र काही सदस्यांनी लॉकडाऊन तात्काळ लावावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

तसेच काही सदस्यांनी नागरिकांना लॉकडाऊन लागण्याआधी तयारीसाठी दोन ते तीन दिवस देण्यात यावे, अशा प्रकारची भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवस लॉक डाऊन लावल्याने कोरोनाची साखळी तोडता येईल का? यासंदर्भात टास्क फोर्ससोबत चर्चा केली. त्यामुळे अद्याप राज्यात लॉकडाऊन लावावा किंवा नाही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच लॉकडाऊन बाबत चर्चा करण्यासाठी टास्क फोर्स सोबत उद्या मुख्यमंत्री पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांची मुख्य सचिव आणि इतर मंत्र्यांसोबत देखील चर्चा -

फास्ट फोर्स सोबत लॉकडॉन बाबतची चर्चा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. लॉकडाऊनसाठी राज्य सरकार किती तयार आहे. सर्व सहकारी मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. तसेच राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली आहे. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. 14 एप्रिलनंतर मुख्यमंत्री लॉकडॉन बाबत निर्णय घेतील, त्या आधी मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत चर्चा करतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर दिली.

तर पुढच्या आठवड्यात सणामुळे गर्दी झाली तर कोरोना वाढेल अशी ही भीती आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती त्यांनी राजकारण करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला त्यावेळी राज्यसरकारने विरोध केला नाही, आता भाजपने विरोध करू नये, असं आवाहन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.