ETV Bharat / city

Mumbai Vaccination : लसीकरणापासून कोणतीही मुले वंचित राहणार नाहीत, मुंबई महापालिकेचा ऍक्शन प्लॅन - मुंबई महापालिकेचा ऍक्शन प्लॅन

ओमायक्रॉन आणि कोरोनाचे रुग्ण ( Mumbai Omicron and corona patients ) झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ऍक्शन प्लॅन ( Mumbai Municipal Corporation Action Plan ) तयार आहे. या लसीकरण मोहिमेत ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशा मुलांचे देखील लसीकरण केले जाणार आहे.

लसीकरण
author img

By

Published : Dec 29, 2021, 5:04 PM IST

मुंबई : देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील ९ लाख मुलांच्या लसीकरणासाठी (Plan to vaccinate 9 lakh children in Mumbai ) मुंबई महापालिकेने ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार लसीकरण केंद्र, कॉलेज आणि वस्तीपातळीवर लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये ओळखपत्र नसलेल्या मुलांचेही लसीकरण केले जाणार आहे. यामुळे कोणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही. तसेच पुरेसा लसींचा साठा असल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण -

जगभरात प्रसार असलेल्या कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे भारतातही रुग्ण ( India omicron cases ) आढळून येत आहेत. देशभरात १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र १८ वर्षाखालील लहान मुलांचे लसीकरण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जानेवारीपासून देशभरात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील वयोवृद्धांना बूस्टर डोस ( Booster Dose ) दिला जाणार असल्याचेही पंतप्रधांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी ( Central Government allows immunization of children ) दिल्याने पालिकेने त्यानुसार नियोजन सुरु केले आहे.

लसीकरणासाठी पालिका सज्ज -

लहान मुलांचे लसीकरण करता यावे यासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात ट्रायल सुरु होती. त्यात सहभागी मुलांवर लसींची ट्रायल घेण्यात आली आहे. यामधील एकाही मुलाला बाधा झालेली नाही. त्यातच आता पंतप्रधानांनी मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केली. पालिकेने १५ ते १८ वयोगटातीला ९ लाख मुलांचे लसीकरण करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. मुंबई महापालिकेच्या, खासगी ३५० लसीकरण केंद्रावर तसेच ज्युनियर कॉलेजमध्येही लसीकरण केले जाणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी १५०० कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर्सनाही ट्रेनिंग दिले जाणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणादरम्यान जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakani )यांनी दिली.

लसींचा पुरेसा साठा -

१६ जानेवारीपासून मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु आहे. या लसीकरण मोहिमेदरम्यान लसींचा साठा नसल्याने अनेकवेळा लसीकरण बंद ठेवावे लागले होते. लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस द्यावी, असे केंद्र सरकराने निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिन लसींचे २ लाख ५० हजार डोस उपलबध आहेत. ९ लाख मुलांपैकी दिवसाला ३० हजार मुले आली, तरी आठवडाभर पुरेल इतका लसींचा साठा आहे. त्यादरम्यान पुन्हा लसीचा साठा येऊन एका महिन्यात लसीकरण पूर्ण होऊ शकते, असे काकाणी यांनी संगितले.

लसीपासून कोणीही वंचित राहणार नाही -

मुंबईत ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही अशा रस्त्यावर राहणाऱ्या, जेलमधील कैद्यांचे आणि तृतीय पंथ्यांचे लसीकरण पालिकेने केले आहे. यामुळे ज्या मुलांकडे आधारकार्ड नाही अशा मुलांच्या शाळेच्या, कॉलेजच्या ओळखपत्रावर लसीकरण केले जाईल. ज्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही, अशा बालसुधार गृह, अनाथ आश्रम आदी ठिकाणच्या मुलांचेही लसीकरण केले जाईल. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही अशी माहिती काकाणी यांनी दिली.

असे केले जाणार लसीकरण -

१५ ते १८ वयोगटातील मुले ही बहुतेक करून ९ ते १२ वी दरम्यानची असणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या कॉलेजला एखादे लसीकरण केंद्र संलग्न करून लसीकरण केले जाईल. तसेच कॉलजेमध्येही लसीकरण केले जाईल. झोपडपट्टी विभागात असलेल्या लसीकरण केंद्रावरही लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. मुंबईत कोविन ऍपवर नोंदणी केलेल्या आणि लसीकरण केंद्रावर थेट आलेल्या सर्व मुलांचे लसीकरण केले जाईल.

कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार -

मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु आहे. १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे टप्पाटप्प्याने लसीकरण, गेले १० महिने सुरु आहे. मुंबईत १०७ टक्के नागरिकांना पहिला तर ८५ टक्के नागरिकांना लसींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. जानेवारी २०२१ पर्यंत मुंबईमधील सर्व नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा संकल्प मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र डिसेंबर महिन्यात पुन्हा कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्णही वाढू लागले आहेत. त्यातच शाळा सुरु झाल्याने लहान मुलांचे लसीकरण कधी होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता.

काय आहेत केंद्र सरकारच्या गाईडलाईन -

देशभरात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील लहान मुलांना लस दिली जाणार आहे. या मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जाईल. 2007 पूर्वी जन्मलेली मुलं-मुली यासाठी पात्र आहेत. यासाठी कोविन ऍपवर या मुलांची नोंदणी करावी लागेल. पालकांनी लस घेताना नोंद केलेल्या मोबाईल नंबरवरून किंवा नवीन मोबाईल नंबर वरून नोंदणी करता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.