ETV Bharat / city

Nitesh Rane on Nawab Malik Arrest : संजय राऊत, मुंबईला आता आमची मुंबई म्हणू नका - नितेश राणे

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीनंतर अटक केली आहे. 1993 मधील आरोपी दाऊद इब्राहिम यांच्या भावासोबत त्यांचे व्यवहारिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याची ( Nawab Malik relation with Dawood Ibrahim ) सूत्रांची माहिती आहे. त्यांची ईडीकडून कसून चौकशी केली जात ( ED probe of Nawab Malik ) आहे. या प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ( Nitesh Rane over Nawab Malik arrest ) खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

author img

By

Published : Feb 23, 2022, 4:16 PM IST

Updated : Feb 23, 2022, 4:30 PM IST

नितेश राणे
नितेश राणे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक ( Nawab Malik arrest by ED ) केली आहे. आता राजकारण तापले असताना नितेश राणे यांनी या प्रकरणावरून शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांना ( Nitesh Rane Slammed Sanjay Raut ) टोला लगावला आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीनंतर अटक केली आहे. 1993 मधील आरोपी दाऊद इब्राहिम यांच्या भावासोबत त्यांचे व्यवहारिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याची ( Nawab Malik relation with Dawood Ibrahim ) सूत्रांची माहिती आहे. त्यांची ईडीकडून कसून चौकशी केली जात ( ED probe of Nawab Malik ) आहे. या प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ( Nitesh Rane over Nawab Malik arrest ) खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

ही एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी

हेही वाचा-ED action against Nawab Malik : ईडीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

काय म्हणाले नितेश राणे!
नितेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले, की जनाब संजय राऊत आमच्या मुंबईवरती झालेल्या 1993 चा भेकड मुंबई ब्लास्टमध्ये २५७ मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते. ७१३ मुंबईकर जबर जखमी झाले होते. दाऊद इब्राहीम त्यात सहभागी होता. हे तुमचे काँग्रेस सरकार सत्तेत असतानाच सिद्ध झाले होते. अशा देशद्रोह्यांसोबत भागिदारीचा आरोप नवाब मलिकांवर आहे. त्याचा सखोल तपास झाला पाहिजे. ही मागणी न करता तुम्ही मलिकांचा बचाव करण्यातच धन्यता मानता. ही एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी आहे. आता या पुढे आपण मुबंईला ‘आपली मुंबई’ म्हणू नका. कारण सत्तेसाठी आपण सगळे विसरलात.

हेही वाचा-Kirit Somaiya On Nawab Malik ED : शरद पवारांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा - किरीट सोमैया

मलिकांचा राजीनामा घ्यावा!
नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राजकारण तापलेले आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सोमैय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सोमैय्या यांनी केली आहे.

हेही वाचा-HM Walse Patil On ED Action : केंद्र सरकारच्या सांगण्यावरून ईडीची मलिकांवर कारवाई : गृहमंत्री वळसे पाटील

काँग्रेसने ही दिली प्रतिक्रिया-

दुसरीकडे नवाब मलिक यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नवाब मलिक यांच्या पूर्ण पाठीशी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.

Last Updated : Feb 23, 2022, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.