मुंबई - दरवर्षीप्रमाणे आपल्या गावातल्या गणपती बाप्पासाठी कोकणवासीयांना आपल्या गावचे वेध लागलेले आहेत. चाकरमानी मंडळी किंवा इतर मंडळी कोकणामध्ये जाऊन आपल्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात. हजारो लाखो लोक मुंबईतून कोकणामध्ये जाण्यासाठी एकच धडपड करतात आणि प्रचंड गर्दीमुळे बस, रेल्वे खाजगी गाड्या यासाठी जास्त पैसे देऊनसुद्धा आपल्याला पाहिजे असलेल आरक्षित तिकीट गणेशोत्सवाच्या काळामध्ये मिळत नाही. त्यामुळे वेळेवर गणेशोत्सवात आपल्याला जाता येत नाही. मात्र, यावर्षी मोदी एक्सप्रेस ही आपल्याला आपल्या गावात दादर रेल्वे स्थानकावरून घेऊन जाणार आहे, आमदार नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे.
खास मोदी एक्स्प्रेस - कोकणातील जनतेला गणपती उत्सव महत्वाचा असतो. सगळी काम सोडून कोकणवासीय आपल्या गावी जाण्याच्या विचारात असतो. त्यासाठी कोणत्या ट्रेन ने किवा बसने जायचे , प्रवास कसा होईल, आरामदायक प्रवास करयला मिळेल का असे अनेक प्रश्न त्याच्या मनात असतात. आमदार नितेश राणे यांनी कोकणच्या जनतेसाठी माहिती दिली आहे. त्याबद्दलचा त्यांनी एक व्हिडिओ देखील प्रसारित केला आहे. यंदा गणेशोत्सवाच्या काळामध्ये 29 ऑगस्टला सकाळी दहा वाजता मध्ये रेल्वेचे दादर रेल्वे स्थानक येथून मोदी एक्सप्रेस धावणार आहे.
कुठून कशी जाईल मोदी एक्सप्रेस - दादर वरून सुटणारी आणि कणकवली पर्यंत जाणारी विशेष मोदी एक्सप्रेस कशी कुठून जाणार आहे, तेही जाणून घ्या. आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या दादर चाणकापासून हिचा प्रवास सुरू होणार. गणेश भक्तांना घेणार कणकवली पर्यंत जाणार आणि जाता जाता मध्येच वैभववाडीला देखील विश्रांती घेणार. तसेच, तुम्हाला जेवणाची चिंता देखील याच्यामध्ये करायची गरज नाही, असहीनितेश राणे यांनी यामध्ये सांगितलेल आहे. या मोदी एक्सप्रेसमध्ये एकवेळेचे जेवणसुद्धा मिळणार आहे तशी सोय केली जाणार असल्याचे नितेश राणे म्हणाले आहेत.
हेही वाचा - Human Flying Drone : माणसाला घेऊन उडणारा ड्रोन पाहिलाय का?; 'येथे' झाली यशस्वी चाचणी