ETV Bharat / city

Nitesh Rane Arrested : नितेश राणे यांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी - Nitesh Rane Arrested

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे हे कणकवली न्यायालयात आज शरण आले होते.

नितेश राणे
नितेश राणे
author img

By

Published : Feb 2, 2022, 3:33 PM IST

Updated : Feb 2, 2022, 8:01 PM IST

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे हे कणकवली न्यायालयात आज शरण आले होते. नितेश राणे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्ज आज मागे घेण्यात आला. त्यानंतर ते कणकवली न्यायालयात शरण आले होते. न्यायालयासमोर शरण आल्याने न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून म्हणणे मागवले. त्यानंतर राणेंचे वकील व सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी राणेंना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नितेश राणे यांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी

आमदार नितेश राणे यांचा राज्य सरकारवर आरोप

दरम्यान कणकवली न्यायालयात हजर होण्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर आरोप केला. सरकार मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत मी कणकवली न्यायालयात हजर होत आहे असे ते यावेळी म्हणाले.

सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध शिवसेना

कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हा संघर्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. तर राणे विरुद्ध शिवसेना असा सामना या निवडणुकीमध्ये रंगला होता. मात्र या निवडणुकीत अखेर राणे यांना मोठे यश मिळाले. यामध्ये राणे गटाच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. तसेच शिवसेनेचे हातात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आता नारायण राणे यांच्या गटाकडे आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोकणामध्ये पुन्हा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.

फेटाळला होता अटकपूर्व जामीन

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यासोबतच 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याची मुदत दिली होती. त्यामुळे नितेश राणे आज जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी आमदार नितेश राणे यांची बाजू मांडली होती.

नेमकं काय झाले होते त्यावेळी ?

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.

Last Updated : Feb 2, 2022, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.