ETV Bharat / city

पहिला प्रयोग तुमच्या मुख्यमंत्र्यांवर करा, नितेश राणे यांची शिवसेना आमदारावर टीका - mumbai latest news

बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबड्या मुख्यमंत्र्यावर करा, अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला आहे.

नितेश राणे
नितेश राणे
author img

By

Published : Apr 18, 2021, 9:56 PM IST

मुंबई - बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबड्या मुख्यमंत्र्यावर करा, अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला आहे.

नितेश राणे यांची शिवसेना आमदारावर टीका
नितेश राणे यांची शिवसेना आमदारावर टीका

नितेश राणे यांनी ट्विट करून घेतला समाचार-

बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते,तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केले. एकेरी भाषेचा वापर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गायकवाड यांच्या या वक्तव्यांचा खरपूस समाचार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून घेतला आहे.

"देवेंद्रजीच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले. हे गायकवाडला कोण सांगेल. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबड्या मुख्यमंत्र्यावर कर. मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर...कुठे घालायची तिथे घाल," अशा शब्दात आमदार राणे यांनी गायकवाड यांच्यावर प्रहार करत शिवसेनेवर हल्ला चढविला आहे.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेची 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.