ETV Bharat / city

'वॉचमन व्हायची लायकी नाही, त्याला आमदार केल्यावर त्रास होणारच'

भाजप नेते निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 'ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही, त्याला आमदार केल्यावर लोकांना त्रास भोगावाच लागतो, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

nilesh rane critisize aditya thackeray
'वॉचमन व्हायची लायकी नाही, त्याला आमदार केल्यावर त्रास होणारच'
author img

By

Published : May 20, 2021, 10:18 PM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा फटका संपूर्ण राज्याला बसला आहे. या चक्रीवादळात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील ४५ वर्षीय महिलेचा अंगावर झाड पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घटना घडली. मात्र, घटनेच्या ३ दिवसांनंतरही वरळीच्या आमदार किंवा भागातील नगरसेवक कोणीही मृत महिलेच्या कुटुंबियांकडे अद्यापपर्यंत फिरकलेच नाही. यावरून भाजप नेते निलेश राणेंनी प्रतिक्रिया देत वरळी विधानसभा आमदार आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 'ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही, त्याला आमदार केल्यावर लोकांना त्रास भोगावाच लागतो, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

nilesh rane critisize aditya thackeray
निलेश राणे यांचे ट्वीट

ट्वीट करून आदित्य ठाकरेंवर टीका -

निलेश राणे यांनी ट्वीट करत, 'ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही, त्याला आमदार केल्यावर लोकांना त्रास भोगावाच लागतो. वरळीकर टीव्हीवर पेंग्विन बघितला तरी शिव्या घालतायत म्हणून मतदान करताना विचार करून केला पाहिजे, नाहीतर असा मनस्ताप होतो.' असे म्हटले आहे.

यापूर्वीही केली टीका -

यापूर्वीदेखील निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. एक व्हिडिओ ट्विट करत राणे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला होता. 'हे चित्र वरळी मतदारसंघाचे आहे. वरळीकर विचारता आहेत. तो 'केम छो वरळी' विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसले, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही.' अशा शब्दांत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता.

हेही वाचा - 'द्यायची वेळ येते त्यावेळी मात्र यांच्याकडून हात आखडता घेतला जातो'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.