मुंबई - अँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने गोरेगाव परिसरातून एका नायजेरियन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. तस्करांकडून २ किलो १४ ग्रॅम मेथाक्वॉलोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ६ कोटी ४ लाख २० हजार रुपये इतकी आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा आफ्रिकन असून तो किमिरा रोडवरून मुंबईत ड्रग्ज पुरवण्यासाठी आला होता. इनुसा गॉडविन असे या आरोपीचे नाव आहे. त्याचा पासपोर्टही कोर्टात जमा करण्यात आला आहे.
हेही वाचा - Gujarat Drug Case : दीड ग्रॅम ड्रग्ज पकडणाऱ्याने द्वारकेतल्या 350 किलो ड्रग्जचा तपास करावा - संजय राऊत
हेही वाचा - Kiran Gosavi : लष्कर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यासाठी गोसावीला 7 दिवसांची पोलीस कोठडी